गाडीच्या बदल्यात मागितली गर्लफ्रेंड, मित्रानेच केली मित्राची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 14:30 IST2018-12-25T14:27:49+5:302018-12-25T14:30:26+5:30
विक्रम आणि विनोद हे दोघे मित्र होते, त्यांची ऐकमेकांसोबत उठबस होती

गाडीच्या बदल्यात मागितली गर्लफ्रेंड, मित्रानेच केली मित्राची हत्या
पलवल - हरयाणात मित्रानेच मित्राची खून केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्यामुळे हे हत्याप्रकरण घडले आहे. याप्रकरणी ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर विनोद कुमार यांच्या हत्येप्रकरणी आरोपी विक्रमला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामध्ये विक्रमने हत्येचा उलगडा केला आहे.
विक्रम आणि विनोद हे दोघे मित्र होते, त्यांची ऐकमेकांसोबत उठबस होती. त्यामुळेच विक्रमने आपल्या गर्लफ्रेंडला फिरविण्यासाठी विनोदकडे गाडीची मागणी केली होती. विनोदने विक्रमला गाडी देण्याचे कबुल केले, पण त्याबदल्यात विक्रमच्या गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यावरुन या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर, 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता विनोद आणि विक्रम गाडीतून फिरायला गेले. त्यावेळी रस्त्यात विक्रमने बिअरच्या दोन बाटल्या विकत घेतल्या अन् त्या पीत-पीतच ते आल्हापूरच्या दिशेने निघाले. मात्र, विक्रम आणि विनोद या दोघांमध्ये पुन्हा त्याच मुद्द्यावरुन वाद झाला. यावेळी, विक्रमने गळा दाबून विनोदचा खून केला. त्यानंतर, विनोदचा मृतदेह एका कचऱ्याच्या उकांड्यावर टाकून दिला. दुसऱ्या दिवशी विक्रमने पुन्हा आपल्या गर्लफ्रेंडला त्याच गाडीतून दिवसभर फिरवले होते.
दरम्यान, याप्रकरणी डीएसपी लोहान यांच्याकडून चौकशी सुरू आहे. तर, या हत्याप्रकरणात आणखी कोणाचातरी हात असल्याचा संशय लोहान यांनी व्यक्त केला आहे.