Video: विद्यार्थिनीच्या प्रश्नानं राकेश टिकैतांची भंबेरी; 'नहीं-नहीं' म्हणत तिच्याकडून माईकच काढून घेतला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 05:01 PM2021-03-06T17:01:44+5:302021-03-06T17:10:10+5:30

येथे शेतकरी नेते राकेश टिकैत आंदोलक शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी आले होते. याच वेळी एक विद्यार्थिनी व्यासपीठावर पोहोचली आणि तिने माईक घेऊन टिकैतांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे प्रश्न असे होते, की खुद्द राकेश टिकैतांचीही भंबेरी उडाली... (Farmer leader rakesh tikait)

Girl came on stage and asked tough questions to Farmer leader rakesh tikait video goes viral on social media | Video: विद्यार्थिनीच्या प्रश्नानं राकेश टिकैतांची भंबेरी; 'नहीं-नहीं' म्हणत तिच्याकडून माईकच काढून घेतला!

Video: विद्यार्थिनीच्या प्रश्नानं राकेश टिकैतांची भंबेरी; 'नहीं-नहीं' म्हणत तिच्याकडून माईकच काढून घेतला!

Next

नवी दिल्ली - केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला 100 दिवस झाले आहेत. दिल्ली शिवाय देशाच्या इतर भागांतही छोठ्या-मोठ्या स्वरुपात आंदोलनं सुरू आहे. भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी विविध राज्यांत जाऊन सभादेखील घेत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावरून अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. याची एक झलक शुक्रवारी झज्जर जिल्ह्यातील ढांसा बॉर्डरवर बघायला मिळाली. (Girl came on stage and asked tough questions to Farmer leader rakesh tikait video goes viral on social media)

शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण; शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार

व्हिडिओ व्हायरल -
येथे शेतकरी नेते राकेश टिकैत आंदोलक शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी आले होते. याच वेळी एक विद्यार्थिनी व्यासपीठावर पोहोचली आणि तिने माईक घेऊन टिकैतांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे प्रश्न असे होते, की ज्यांची उत्तर कदाचित राकेश टिकैतांकडेही नव्हती. या विद्यार्थिनीने प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर व्यासपीठावर गोंधळ उडाला. यानंतर, लगेचच तिच्या हातून माईक हिसकावण्यात आला आणि तिला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. 

या विद्यार्थिनीने विचारलेल्या या प्रश्नांचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून हजारो लोकांनी शेअरही केला आहे.

शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखण्याची हिंमत पोलिसांमध्ये नाही; राकेश टिकैत यांची टीका

काय म्हणाली विद्यार्थिनी -
या व्हिडिओतील पॅन्ट-शर्ट परिधान केलेली तरुण मुलगी म्हणेत, 'राकेश टिकैतांना काही प्रश्न विचारण्याची माझी इच्छा आहे, की ते उत्तर मिळावे, त्या समस्येचा तोडगा मिळावा, ते असे मिळावे, की देशातील तरुणालाही त्रास होऊ नये आणि शेतकऱ्यालाही त्रास होऊ नये. आपण म्हणालात, की चार-पाच पोळ्या करून आणा, जेनेकरून एकी रहावी आणि अशात आपले आंदोलनही सुरू राहील. ही आपली चांगली गोष्ट आहे. आपण म्हणालात, की आमचे आंदोलन सुरूच राहील, जोवर सरकार ऐकत नाही, तोवर आम्ही आडून राहू. पण, एक टक्का अथवा 0.005 टक्के जरी गृहित धरले, की सरकारही मागे हटले आणि आणि आपणही हटला नाहीत, तर त्या गोष्टीचा शेवट कुठे होणार आणि यामुळे आपल्या सममाजावर, आपल्या सलोख्यावर.... जसे की 26 जानेवारीची घटना झाली. ज्यात तुमच्या लोकांचा हात होता की नव्हता हे आम्हाला माहित नाही.'

राकेश टिकैत यांचे आवाहन; पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी पीकावरून फिरवला ट्रॅक्टर

विद्यार्थिनीला व्यासपीठावरून उतरवलं -
एवढे बोलल्यानंतर व्यासपीठावर गोंधळ उडाला. स्वतः राकैश टिकैत यांचीही भंबेरी उडाली आणि लगेचच विद्यार्थिनीच्या हातून माईक हिसकावण्यात आला. यावर ती विद्यार्थिनी म्हणते, 'तुम्ही लोक तर असे चुकीचे करत आहात ना, देशातील तरुण तर प्रश्न विचारणारच.' यानंतर व्यासपीठावरील लोक आणखीणच संतापले आणि त्या तरुणीला नाव विचारू लागले. यावर या तरुणीनेही न डगमगता आपले नाव सांगितले. यानंतर तेथे उपस्थित असलेले लोक ती विद्यार्थी नेता असल्याचे म्हणू लागले. यावरही कोणती विद्यार्थी संघटना? असा सवालही त्या विद्यार्थिनीनं केला. व्हिडियोमद्ये स्पष्टपणे देसत आहे, की यानंतर एक महिला व्यासपीठावर येते आणि विद्यार्थिनीला व्यासपीठावरून खाली उतरण्यास सांगते.

Edited By: श्रीकृष्ण अंकुश 

Web Title: Girl came on stage and asked tough questions to Farmer leader rakesh tikait video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.