शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

माळढोक संरक्षणात शेतकऱ्यांचे सहकार्य मिळवणार

By admin | Updated: September 23, 2014 04:37 IST

माळढोक पक्ष्यांचे रक्षण व संवर्धन आता शेतकऱ्यांच्या मदतीनेच करण्याचा निर्धार महाराष्ट्राच्या वनाधिकारी आणि संशोधकांनी केला आहे

राजू नायक, पणजीमाळढोक पक्ष्यांचे रक्षण व संवर्धन आता शेतकऱ्यांच्या मदतीनेच करण्याचा निर्धार महाराष्ट्राच्या वनाधिकारी आणि संशोधकांनी केला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीबरोबरच त्यांनी थोडी जमीन माळढोक पक्ष्यांसाठी सोडावी, असा हा प्रयत्न असेल. एकेकाळी ११ राज्यांत आढळणारा हा पक्षी २०१३ साली आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन मंडळाच्या ‘अत्यंत दुर्मीळ पक्षां’च्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला. सध्या भारतात महाराष्ट्रासह पाच राज्यांत या पक्ष्यांची संख्या २५० असून महाराष्ट्रात ती विलक्षणरीत्या घटून केवळ १०-१२ राहिली आहे.गोवा भेटीवर आलेले महाराष्ट्राचे मुख्य वनपाल (वन्यपशू विभाग पुणे) सुनील लिमये यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की शेतकऱ्यांनी अर्धा गुंठा जमीन माळढोक प्रकल्पासाठी सोडली तरी त्यांना २० हजार रुपयांपर्यंत आर्थिक साह्ण दिले जाऊ शकते.माळढोक हे मुख्यत्वे कुरणे व गवताळ भागात राहातात; परंतु कालवे निर्माण झाल्याने व पाणी मुबलक उपलब्ध झाल्यावर लोकांनी कुरणे संपवली. त्या जमिनीत ऊस, द्राक्ष पिके घेतली जाऊ लागली. त्यातून माळढोकवर आक्रित आले.एका अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्णातील नान्नज भागात केवळ दोन माळढोक पक्षी शिल्लक आहेत. पर्यावरणवाद्यांच्या मते हे अभयारण्यही आता नावाला शिल्लक आहे. त्याच्या चारही बाजूंनी गावे आहेत आणि लोकसंख्या वाढल्याने त्यांचेही अस्तित्व संकटात आहे. नामांकित माळढोक संशोधक डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, चांगले जंगल निर्माण केल्याने वाघ तसेच अन्य श्वापदांप्रमाणे माळढोक तेथेच वास्तव्य करतील असे नाही. माळढोक हा वन खात्याच्या हद्दीतही राहतोच असे नाही. वन खात्याने जंगल व्यवस्थापन व कुरणांचे रक्षण यात चांगली कामगिरी बजावली आहे; परंतु शेतकरी व स्थानिक समाजाबरोबर खूप आधी त्यांनी काम करायला हवे होते,’ असे सांगून डॉ. पाटील म्हणाले, परंपरागत व सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणे, माळढोक येत असलेल्या कुरणांमध्ये किंवा पडीक जमिनीत मेंढपाळ किंवा इतर राज्यांतील गुरांना चराईबंदी करणे, त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना मदत करणे आदी उपाय वन खात्याने योजावे लागतील.महाराष्ट्रात काही ठिकाणी गुजरातमधील गुरांना भाडेपट्टीवर जमिनी दिल्या जातात. हस्तक्षेपामुळे माळढोक पक्षी पळून जातात. अशा शेतकऱ्यांना आर्थिक साह्ण देण्याची कल्पना मी स्वत:च मांडली व आता तिचा वन खात्याने स्वीकार केला आहे, असे पाटील म्हणाले.