शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
4
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
5
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
6
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
7
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
8
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
9
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
10
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
12
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
13
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
14
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
15
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
16
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
17
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
18
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
19
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
20
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

Global Warming: जीवघेण्या उष्णतेस तयार व्हा; पृथ्वीचे तापमान १.५% वाढणार; पूर, दुष्काळ, चक्रीवादळे येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:31 IST

Global Warming Future Prediction: पुढे उष्ण वर्ष येण्याची ८०% शक्यता असल्याचे डब्ल्यूएमओने म्हटले

Global Warming Future Prediction: जगाला येत्या काही वर्षांमध्ये आणखी विक्रमी उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. ही उष्णता माणसाच्या जिवावर बेतणारी, आगीत वाढ करणारी आणि अधिक असह्य ठरणारी असून,  जीवघेण्या उष्णतेसाठी सज्ज व्हा, असा इशारा जागतिक हवामान संघटना आणि  ब्रिटनच्या हवामान विभागाने दिला आहे. २०२५ ते २०२९ या पाच वर्षांत पृथ्वीचे तापमान १.५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता ७०%ने वाढली आहे. त्यामुळे पुढे उष्ण वर्ष येण्याची ८०% शक्यता असल्याचे डब्ल्यूएमओने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

अर्थव्यवस्थेला फटका

आपण मागील काळात सर्वांत १० उष्ण वर्षे अनुभवली आहेत. भविष्यातही तापमानवाढ अटळ असून, त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर, दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होणार असल्याचे डब्ल्यूएमओने सांगितले.

सरासरीपेक्षा १.२ ते १.९ टक्के तापमान जास्त असेल 

२०२५ ते २०२९ या दरम्यान प्रत्येक वर्षी सरासरी तापमानापेक्षा पृथ्वीचे तापमान १८५० ते १९०० दरम्यान म्हणजेच औद्योगिकीकरणापूर्वीच्या तापमान पातळीच्या सरासरीपेक्षा १.२ ते १.९ टक्के जास्त असेल. 

या पाच वर्षांत किमान एक वर्ष असे असेल, त्याचे तापमान १८५०-१९००च्या सरासरीपेक्षा १.५ अंशांपेक्षा जास्त असण्याची ८६ टक्के शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे.

१.५ अंशापेक्षा अधिक वाढल्याने काय होईल? 

उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होतील आणि उष्माघाताने मृत्यू वाढतील.

पूर, दुष्काळ आणि चक्रीवादळे यांची तीव्रता वाढेल.

जंगलातील आग लागण्याचे प्रमाण अधिक होईल.

किनारपट्टीवरील भाग जलमय होतील, लोकांचे विस्थापन होईल.

अन्नधान्याचे दर वाढू शकतात आणि उपासमार वाढू शकते.

गरिबांवर आणि विकसनशील देशांवर याचे अधिक परिणाम होतील. 

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघातpollutionप्रदूषणRainपाऊसdroughtदुष्काळ