कोलकाता : इंडियन मुजाहिदीनच्या एका संशयित दहशतवाद्याला बुधवारी कोलकाता येथे पोलिसांनी अटक केली. हा दहशतवादी २०१०मध्ये पुणे येथील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटात सामील असल्याचा संशय आहे. झाहिद हुसैन असे त्याचे नाव असून, तो बांगलादेशचा नागरिक आहे. कोलकाता रेल्वे स्थानकावर त्याला जेरबंद करण्यात आले. (वृत्तसंस्था)
जर्मन बेकरी स्फोटातील संशयित दहशतवादी अटकेत
By admin | Updated: July 4, 2014 04:21 IST