शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला

By admin | Updated: November 15, 2016 19:20 IST

दरवर्षी रेल्वे आणि अर्थ संकल्प दोन वेगवेगळ्या दिवशी सादर केले जात होते. मात्र, आता यापुढे एकत्र बजेट सादर होणार आहे. सर्वसमावेशक बजेट पुढील वर्षी १ फेब्रुवारी २०१7 रोजी सादर होणार आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १५ -  दरवर्षी रेल्वे आणि अर्थ संकल्प दोन वेगवेगळ्या दिवशी सादर केले जात होते. मात्र, ८२ वर्षानंतर प्रथमचं एकत्र बजेट सादर होणार आहे. सुत्राच्या माहितीनुसार सर्वसमावेशक बजेट पुढील वर्षी १ फेब्रुवारी २०१७ रोजी सादर होणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नेहमीपेक्षा सुमारे १५ दिवस आधी सुरू होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. साहजिकच हे बजेट कसं असणार आहे याबद्दल संपूर्ण देशाला याबद्दल उत्सुक्ता असेल. 
 
रेल्वे अर्थसंकल्पाचे सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये विलिनीकरण झाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्पीय सादर करण्यात येणार आहे. आतापर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प वेगवेगळे मांडण्याची प्रथा चालत आली आहे. परंतु यावेळी हे दोन्ही अर्थसंकल्प विलीन करून एकत्रित सादर केले जाणार आहे. 
 
 
नियोजित बदल आणि त्याचे रेल्वेला फायदे
 
- स्वतंत्र अर्थसंकल्प बंद झाला तरी सरकारची व्यापारी आस्थापना म्हणून रेल्वेचे अस्तित्व कायम.
- रेल्वेची कार्यात्मक स्वायत्तता अबाधित व वित्तीय अधिकारही सध्याप्रमाणेच. 
- सध्याची वित्तीय व्यवस्था कायम. सर्वसाधारण कामकाज खर्चासह सर्व महसुली खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शन हे रेल्वेच्या उत्पन्नातूनच.
- रेल्वेच्या खातेपुस्तकांत केंद्र सरकारचे सुमारे २.२७ लाख कोटी रुपयांचे भांडवल तसेच राहील. मात्र त्यावर यापुढे रेल्वेकडून केंद्राला लाभांश नाही. लाभांशापोटी दरवर्षी द्यावी लागणारी सुमारे ९,७०० कोटी रुपयांची रक्कम रेल्वेकडेच राहील.
- इतर खात्यांप्रमाणे रेल्वेलाही केंद्रीय अर्थसंकल्पातून पैसे मिळतील.निधी.
- रेल्वेच्या खर्चाचे विनियोजनही मुख्य विनियोजन विधेयकातच.
- एकत्रित अर्थसंकल्प मांडल्याने रेल्वेला कारभारावर लक्ष केंद्रित करता येईल व सरकारच्या वित्तीय स्थितीचे सर्वंकष चित्र स्पष्ट होईल.
- प्रक्रियात्मक मंजुरीची गरज न राहिल्याने निर्णय झटपट होतील व सुशासनाच्या मोजपट्टीत रेल्वेही येईल.