शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

गौतम गंभीरच्या अडचणींत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 2:15 PM

पूर्व दिल्लीमधून गंभीरने काल कोणतीही परवानगी न घेता प्रचारसभा घेतली.

नवी दिल्ली : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता राजकीय मैदानात उतरलेल्या गौतम गंभीर विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्व दिल्लीमध्ये विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन केल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. शुक्रवारीच गंभीरवर मतदार यादीत दोनवेळा नोंदविण्यात आल्याचा आरोप करत गुन्हा नोंदविण्यात आला होता. यामुळे गंभारसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 

पूर्व दिल्लीमधून गंभीरने काल कोणतीही परवानगी न घेता प्रचारसभा घेतली. याविरोधात आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. यावर आयोगाने दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांना गंभीरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गंभारचे नाव दोन ठिकाणी असल्याच्या विरोधात आपने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात गुन्ह्याची तक्रार दाखल केली होती. यावर 1 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

 

गौतम गंभीरजवळ राजेंद्र नगर आणि करोल बागमधील दोन मतदान कार्ड आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्याला एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा आरोप पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार आतिशी यांनी गौतम गंभीर केला आहेत. यावेळी आतिशी म्हणाल्या,'आम्ही याप्रकरणी गौतम गंभीरविरोधात तीस हजारी न्यायालयात गुन्ह्याची तक्रार केली आहे.' 

 

तसेच, ट्विटरच्या माध्यमातून आतिशी यांनी गौतम गंभीरला मतदान करुन आपले मत व्यर्थ करु नका असे आवाहन केले आहे. 'गौतम गंभीरला मतदान करुन आपले मदतान व्यर्थ करु नका. त्यांना लवकरच दोन मतदान कार्ड बाळगल्याप्रकरणी दोषी ठरविले जाईल. आपले मतदान व्यर्थ करु नका.' 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरeast-delhi-pcपूर्व दिल्लीBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग