गौतम गंभीरवर चालणार खटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 06:29 IST2025-08-26T06:29:18+5:302025-08-26T06:29:40+5:30
Gautam Gambhir: कोविड काळात बेकायदा औषध साठा व वितरण प्रकरणात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, त्यांची फाउंडेशन आणि कुटुंबीयांविरुद्ध दाखल झालेला खटला थांबवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

गौतम गंभीरवर चालणार खटला
नवी दिल्ली - कोविड काळात बेकायदा औषध साठा व वितरण प्रकरणात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, त्यांची फाउंडेशन आणि कुटुंबीयांविरुद्ध दाखल झालेला खटला थांबवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.
गंभीर यांच्या वकिलांनी सांगितले की, गंभीर माजी खासदार, भारतीय संघाचे माजी कर्णधार असून त्यांनी महासाथीत लोकांना ऑक्सिजन सिलिंडर व औषधे पुरवून मदत केली. मात्र, न्यायालयाने ही मुद्दे अप्रासंगिक ठरवले. न्यायालयाने म्हटले की, “फक्त नाव, प्रतिमा किंवा केलेली कामगिरी यावरून दिलासा मिळत नाही. न्यायालयात ‘नेम ड्रॉपिंग’ चालत नाही.”