गौतम अदानी देणार मदतीचा हात, महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:52 IST2025-01-29T16:51:27+5:302025-01-29T16:52:59+5:30
उद्योगपती गौतम अदानी यांनी प्रयागराजमधील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त मदत करण्याची भूमिका मांडली आहे.

गौतम अदानी देणार मदतीचा हात, महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल काय म्हणाले?
Gautam Adani Mahakumbh Stampede News: महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी दुःख व्यक्त केले. ह्रदयद्रावक घटनेमुळे व्यथित असल्याचे सांगत गौतम अदानींनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरींच्या घटनेबद्दल गौतम अदानी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेवर काय म्हणाले गौतम अदानी?
"महाकुंभमध्ये घडलेली ह्रदयद्रावक घटनेमुळे आम्ही अत्यंत व्यथित आहोत. आम्ही दिवंगत आत्मांना विनम्र श्रद्धांजली अपर्ण करतो आणि शोकाकुल कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो", असे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
"महाकुंभ मेळ्यात उपस्थित असलेल्या अदानी कुटुंबातील सर्व सदस्य आणि संपूर्ण अदानी समूह कुंभमेळा प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यासोबत मिळून पीडित कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत करण्यास कटिबद्ध आहे", असे गौतम अदानी यांनी जाहीर केले.
महाकुंभ में घटी हृदयविदारक घटना से हम अत्यंत व्यथित है।
— Gautam Adani (@gautam_adani) January 29, 2025
हम दिवंगत आत्माओं को अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करते हैं और शोक संतप्त परिवारों के प्रति गहरी संवेदना प्रकट करते हैं।
महाकुंभ में उपस्थित अदाणी परिवार के सभी सदस्य और संपूर्ण अदाणी समूह मेला प्रशासन व राज्य सरकार के…
गौतम अदानींही महाकुंभमध्ये झाले होते सहभागी
उद्योगपती गौतम अदानीही प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले होते. सहकुटुंब त्यांनी अमृत स्नान केले. त्यांनी घाटावर पूजा आरती केली होती. त्याचबरोबर इस्कॉन मंदिर शिबिरालाही त्यांनी भेट दिली आणि श्रम सेवा अर्पण केली होती.
अदानी समूह महाकुंभ मेळ्यात येणाऱ्या भाविकांची सेवा करत आहेत. इस्कॉनच्या सोबत मिळून महाप्रसादाचं वाटप करत आहे.