गौताळा अभयारण्य जोड-

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:33+5:302015-02-18T00:13:33+5:30

गौताळा अभयारण्यासाठी हिवरखेडा तपासणी नाका आहे. या नाक्यावर सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दोन वनरक्षक व एका वनमजुराची नेमणूक आहे, तर रात्री दोन वनमजुरांची नियुक्ती आहे. अभयारण्यातून जाणार्‍या प्रत्येक वाहनाची नोंद घेऊन तपासणी होणे आवश्यक असते; मात्र दिवसभर ही तपासणी होताना किंवा वाहन क्रमांकाची नोंद होताना दिसत नाही. अभयारण्यात येणार्‍या पर्यटकांकडून फी घेतली जाते; मात्र जिथे वाहनांबाबत कोणतीही माहिती वन विभागाकडे नसल्याने पर्यटकांकडून मिळणारी फी अनेकदा मिळत नाही.

Gautala Wildlife Sanctuary Add- | गौताळा अभयारण्य जोड-

गौताळा अभयारण्य जोड-

ताळा अभयारण्यासाठी हिवरखेडा तपासणी नाका आहे. या नाक्यावर सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दोन वनरक्षक व एका वनमजुराची नेमणूक आहे, तर रात्री दोन वनमजुरांची नियुक्ती आहे. अभयारण्यातून जाणार्‍या प्रत्येक वाहनाची नोंद घेऊन तपासणी होणे आवश्यक असते; मात्र दिवसभर ही तपासणी होताना किंवा वाहन क्रमांकाची नोंद होताना दिसत नाही. अभयारण्यात येणार्‍या पर्यटकांकडून फी घेतली जाते; मात्र जिथे वाहनांबाबत कोणतीही माहिती वन विभागाकडे नसल्याने पर्यटकांकडून मिळणारी फी अनेकदा मिळत नाही.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वाहनांबाबत तपासणी नाक्यावर माहिती घेतली गेली तर अभयारण्यात घडणार्‍या अवैध गोष्टींनाही आळा बसू शकेल; मात्र दुर्दैवाने तपासणी नाक्यावर वाहनांबाबत कोणत्याही स्वरूपाची माहिती नोंदविली जात नाही. त्यामुळे अभयारण्याच्या सुरक्षिततेबाबत छातीठोकपणे दावा करता येणे शक्य नाही.
दिवसा तपासणी करता येणे शक्य नाही; कारण नागद व करंजखेडा असा रस्ता अभयारण्यातून जातो. त्यामुळे या गावातील आणि गावाला जाणारे वाहनधारक हुज्जत घालतात; मात्र रात्री वाहनांची तपासणी व नोंद घेतली जाते, असे वनक्षेत्रपाल (वन्यजीव) तांबे यांनी सांगितले.

फोटो :- (१) पाणवठ्यांमध्ये साचलेले निळे-काळे पाणी.
(२) तपासणी नाक्यांवर वाहनांची तपासणी होत नाही, हे दर्शविणारे छायाचित्र.

Web Title: Gautala Wildlife Sanctuary Add-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.