गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 06:24 IST2024-01-02T06:23:24+5:302024-01-02T06:24:19+5:30

भारतामध्ये निरपराध नागरिकांच्या हत्या घडविण्यासाठी सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा, स्फोटके यांची तस्करी करण्यात ब्रारचा हात असल्याचा आरोप आहे. 

Gangster Goldie Brar declared a terrorist | गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित

गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित

नवी दिल्ली : कॅनडा येथील गँगस्टर गोल्डी ब्रार याला भारताने दहशतवादी घोषित केले आहे. भारतामध्ये निरपराध नागरिकांच्या हत्या घडविण्यासाठी सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा, स्फोटके यांची तस्करी करण्यात ब्रारचा हात असल्याचा आरोप आहे. 

सतविंदर सिंग ऊर्फ सतिंदरजित सिंग ऊर्फ गोल्डी ब्रार याचे बब्बर खालसा इंटरनॅशनल या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशीदेखील संबंध आहेत.  केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी गोल्डी ब्रार सक्रिय असतो. त्यामुळे त्याला दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. 

Web Title: Gangster Goldie Brar declared a terrorist