शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गांजा तस्कर नाना ऊर्फ शरिफला अटक

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

आठ वर्षे गुंगारा : विशाखाप˜णमला पकडले

आठ वर्षे गुंगारा : विशाखापट्टणमला पकडले
नागपूर : आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गांजा तस्कर मोहम्मद शरिफ ऊर्फ नाना इसाक याला अटक करण्यात गुन्हेशाखेच्या पथकाने यश मिळवले.
गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ३ जानेवारीला २० किलो गांजासह चौघांना पकडले होते. त्यांच्या चौकशीतून गांजा तस्कर नाना याची माहिती पोलिसांना कळली. त्यावरून अमलीपदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे, पीएसआय मुस्ताक शेख, हवालदार दत्ता बागुल यांच्या पथकाने विशाखापट्टणम गाठून नानाला पकडले. त्याला नागपुरात आणून त्याची चौकशी करण्यात आली.
नानाची टोळी असून, गांजा विकण्याच्या आरोपाखाली कोर्टाने त्याला २००३ मध्ये १० वर्षे कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. शिक्षा भोगत असताना प्रकृती बिघडल्यामुळे त्याला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. तेथून २९ डिसेंबर २००६ ला आरोपी नाना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. त्याचा पोलीस ठिकठिकाणी शोध घेत होते. तब्बल ८ वर्षांनतर तो पोलिसांच्या हाती लागला.
-----