मध्य प्रदेशमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 05:31 IST2021-01-12T05:31:27+5:302021-01-12T05:31:37+5:30

बलात्कारपीडित महिलेचा पती चार वर्षांपूर्वी मरण पावला असून तिला दोन लहान मुले आहेत.

Gang rape of a woman in Madhya Pradesh | मध्य प्रदेशमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

मध्य प्रदेशमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

ठळक मुद्देबलात्कारपीडित महिलेचा पती चार वर्षांपूर्वी मरण पावला असून तिला दोन लहान मुले आहेत.

भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये एका महिलेवर शनिवारी रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेतील आरोपींनी त्या महिलेच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसवून क्रूरतेचा कळस गाठला. निर्भया प्रकरणाची आठवण व्हावी असा हा भीषण प्रकार आहे. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.
ही घटना अमलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे.

बलात्कारपीडित महिलेचा पती चार वर्षांपूर्वी मरण पावला असून तिला दोन लहान मुले आहेत. ही महिला सध्या आपल्या बहिणीकडे राहात असून, ती एक दुकान चालवून आपल्या कुटुंबाची उपजीविका करते. आरोपी शनिवारी रात्री या महिलेच्या घरी गेले व तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. या महिलेने पाणी देण्यास नकार दिल्याने चार आरोपी तिच्या झोपडीत घुसले व सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसविली व ते तिथून पळून गेले. जखमी अवस्थेतील बलात्कारित पीडितेला परिसरातील लोकांनी रिक्षात घालून अमलिया पोलीस ठाण्यात नेले. तिथून तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला रिवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिथे या महिलेवर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली.

Web Title: Gang rape of a woman in Madhya Pradesh