जी-मेलची माहिती बाहेरच्या कंपन्यांना? वॉल स्ट्रीट जर्नलचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 05:25 IST2018-07-04T05:25:58+5:302018-07-04T05:25:58+5:30
गुगलकडून बाहेरच्या कंपन्यांना (थर्ड पार्टी डेव्हलपर्स) ना जी-मेलचा अॅक्सेस (पाहण्याची मुभा) दिला जातो. त्याद्वारे या कंपन्या लाखो जी-मेलपर्यंत पोहोचतात, असा दावा दी वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे.

जी-मेलची माहिती बाहेरच्या कंपन्यांना? वॉल स्ट्रीट जर्नलचा दावा
नवी दिल्ली : गुगलकडून बाहेरच्या कंपन्यांना (थर्ड पार्टी डेव्हलपर्स) ना जी-मेलचा अॅक्सेस (पाहण्याची मुभा) दिला जातो. त्याद्वारे या कंपन्या लाखो जी-मेलपर्यंत पोहोचतात, असा दावा दी वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. जी-मेल अॅक्सेस सेटिंगच्या माध्यमातून कंपन्या आणि थर्ड पार्टी डेव्हलपर्स यूजर्सच्या ई-मेलपर्यंत म्हणजेच वैयक्तिक माहितीपर्यंत पोहोचू शकतात, असेही यात म्हटले आहे.
जी-मेलचा अॅक्सेस केवळ थर्ड पार्टीलाच नव्हे तर, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही दिला जातो, असे स्पष्ट करून यात असाही दावा करण्यात आला आहे की, कंपनीच्या कर्मचाºयांनी दोन वर्षांत ८ हजारपेक्षा अधिक ई-मेल वाचले आहेत. गुगल वापरकर्त्यांना विचारते की, थर्ड पार्टी डेव्हलपर्सना आपल्या ई-मेलमध्ये प्रवेश द्यावा का? यूजर्स अजाणतेपणे अशी परवानगी देऊन टाकतात. मात्र, ज्यांनी अशी परवानगी जी-मेलला दिली आहे, त्यांना आपली माहिती थर्ड पार्टीला दिली जात असल्याचे माहीतच नसते.
डेटा देण्यापूर्वी तपासणी
गुगलचा असा दावा आहे की, वापरकर्त्याच्या संमतीनंतर डेव्हलपर्सना डेटा देण्यापूर्वी त्याची कसून तपासणी केली जाते. तथापि, विशिष्ट प्रकरणात आमचे कर्मचारी ई-मेल वाचू शकतात. अर्थात, हे सुरक्षेच्या उद्देशानेच केले आहे.