इंधन टंचाईचं संकट, मोदीनीं शुक्रवारी बोलावली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, मोठा निर्णय होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 17:47 IST2026-03-26T17:41:27+5:302026-03-26T17:47:51+5:30

PM Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली असून, संध्याकाळी ६.३० च्या सुमारास व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीमध्ये पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणात आहेत.

Fuel shortage crisis, PM Narendra Modi calls meeting of Chief Ministers of all states on Friday, will a big decision be made? | इंधन टंचाईचं संकट, मोदीनीं शुक्रवारी बोलावली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, मोठा निर्णय होणार? 

इंधन टंचाईचं संकट, मोदीनीं शुक्रवारी बोलावली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, मोठा निर्णय होणार? 

पश्चिम आशियामध्ये अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाला आता एक महिना होत आला आहे. हा महिनाभर चाललेल्या संघर्षामुळे भारतासह अनेक देशांसमोर इंधन टंचाईचं मोठं संकट आ वासून उभं राहिलं आहे. त्यातच गॅस आणि पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवा पसरत असल्याने गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंपांसमोर रांगा लागत आहेत. सरकाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आणि घाबरून न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली असून, संध्याकाळी ६.३० च्या सुमारास व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीमध्ये पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणात आहेत.

या बैठकीमध्ये या संकटाच्या काळात राज्यांनी केलेली तयारी आणि योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीचा हेतू देशभावनेंतर्गत सर्व प्रयत्नांमध्ये परस्पर ताळमेळ सुनिश्चित करणे हा आहे. मात्र आचार संहिता लागू झालेली असल्याने निवडणुका असलेल्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सहभागी करून घेतलं जाणार नाही. या राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत कॅबिनेट सचिवालयाच्या माध्यमातून स्वतंत्र बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे.

दरम्यान, आखातातील संघर्षामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये माहिती दिली होती.  तेल आणि गॅसचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मेड इन इंडिया जहाजे आणि साठवणीचा रोडमॅप अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला होता. तसेच साठेबाजांवर कारवाई करण्याचे आवाहन मोदींनी राज्य सरकारांना केलं होतं.  

Web Title : ईंधन संकट: मोदी ने शुक्रवार को मुख्यमंत्रियों की बैठक बुलाई।

Web Summary : मध्य पूर्व तनाव के कारण ईंधन की कमी की आशंकाओं के बीच, पीएम मोदी ने राज्यों की तैयारियों की समीक्षा करने और राष्ट्रीय समन्वय सुनिश्चित करने के लिए मुख्यमंत्रियों के साथ एक बैठक बुलाई है। चुनाव वाले राज्यों को अलग से संबोधित किया जाएगा। पीएम ने पहले तेल और गैस की आपूर्ति को सुरक्षित करने के उपायों की रूपरेखा दी थी।

Web Title : Fuel Crisis: Modi calls meeting with Chief Ministers this Friday.

Web Summary : Amid fuel scarcity fears due to Middle East tensions, PM Modi has convened a meeting with Chief Ministers to review states' preparedness and ensure national coordination. Election-bound states will be addressed separately. The PM previously outlined measures to secure oil and gas supplies.