fuel price hikes petrol and diesel prices hiked | Today's Fuel Price: इंधन दरवाढीने दिवसाची सुरुवात; पेट्रोल 14, डिझेल 20 पैशांनी महागले
Today's Fuel Price: इंधन दरवाढीने दिवसाची सुरुवात; पेट्रोल 14, डिझेल 20 पैशांनी महागले

ठळक मुद्देदर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे.मुंबईत आज पेट्रोल 14 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 76.11 रुपये मोजावे लागतील. दिल्लीत पेट्रोलचे दर 14 पैशांनी तर डिझेलचे दर 19 पैशांनी वधारले आहेत.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 14 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 76.11 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 20 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 67.82 रुपयांवर गेला आहे. 

दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 14 पैशांनी तर डिझेलचे दर 19 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 70.47 रुपये आणि 64.78 रुपये मोजावे लागतील. 

(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)


गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने घसरण होत होती. 16 जानेवारी रोजी मुंबईत पेट्रोल फक्त 8 पैशांनी स्वस्त झालं होतं. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 75.97 रुपये मोजावे लागले. मात्र डिझेलच्या दरात 13 पैशांची वाढ झाली होती. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 67.62 रुपयांवर आला होता. तसेच दिल्लीतही इंधनाचे दर घटले होते. दिल्लीतही पेट्रोल 8 पैशांनी स्वस्त झालं. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 70.33 रुपये मोजावे लागले तर डिझेलच्या दरात 12 पैशांची वाढ झाली होती. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 64.59 रुपयांवर आला होता. 


(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)

English summary :
Fuel Price Latest Update: Petrol and diesel prices have increased. Petrol in Mumbai has been expensive by 14 paise today. Therefore, Mumbaikar will have to pay Rs 76.11 for petrol today. Diesel rates also increased by 20 paise. So, the price of diesel in Mumbai has gone up to 67.82.


Web Title: fuel price hikes petrol and diesel prices hiked
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.