शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

ज्याची भीती होती तेच झाले...! बिहारमध्ये पेट्रोल ५ रुपयांनी महागले; डिझेलच्या किमतीतही ३ रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 10:41 IST

Petrol Diesel Price Hike Latest news: बिहारमध्ये इंधन दरवाढीचा भडका! प्रीमियम पेट्रोलनंतर आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार? जाणून घ्या नवे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ आणि मध्यपूर्वेतील तणावाचा थेट परिणाम आता बिहारमधील इंधन दरांवर दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत प्रीमियम पेट्रोल आणि इंडस्ट्रियल डिझेलच्या किमती वाढल्यानंतर, आता सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. 

गुरुवारी सकाळी ६ वाजेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती लागू करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चे तेल आणि कर संरचनेतील बदलांमुळे ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या दरवाढीमुळे पेट्रोलने ११० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, पेट्रोलमध्ये प्रति लिटर ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जुनी किंमत १०५.३५ रुपयांवरून आता ११०.३५ रुपये झाली आहे. तर डिझेलमध्ये प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जुनी किंमत ९१.५८ रुपयांवरून आता ९४.५८ रुपये झाली आहे.

मालवाहतूक आणि प्रवासावर परिणामडिझेलच्या किमतीत ३ रुपयांनी वाढ झाल्यामुळे ट्रक, टेम्पो आणि इतर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा खर्च वाढणार आहे. याचा थेट परिणाम फळे, भाजीपाला आणि धान्याच्या किमतीवर होऊ शकतो. तसेच, बस आणि रिक्षा भाड्यातही वाढ होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी वाढऑईल मार्केटिंग कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत आधीच प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. मात्र, सर्वात मोठा फटका इंडस्ट्रियल डिझेलला बसला असून, त्याच्या किमतीत प्रति लिटर २२ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा फटकातज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि मध्यपूर्वेतील (इराण-अमेरिका) तणावामुळे इंधन आयातीचा खर्च वाढला आहे. यामुळे येणाऱ्या काळात किमतीत आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Fuel Prices Surge: Petrol Up ₹5, Diesel Up ₹3

Web Summary : Bihar sees sharp fuel price hike. Petrol increased by ₹5, now ₹110.35 per liter, diesel up ₹3 to ₹94.58. Transportation costs will rise affecting commodity prices and the common man's budget due to international crude oil prices and Middle East tensions.
टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढFuel Crisisइंधन टंचाईIranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरPetrolपेट्रोलDieselडिझेल