fruit trader sent to jail by Madhya pradesh raisen police after the spitting on fruits video found right in investigation sna | 'या' थुंकी लावून फळे विकणाऱ्याला अटक, व्हिडिओ खरा असल्याचे चौकशीत स्पष्ट

'या' थुंकी लावून फळे विकणाऱ्याला अटक, व्हिडिओ खरा असल्याचे चौकशीत स्पष्ट

ठळक मुद्देसंबंधित व्हिडिओ 16 फेब्रुवारीचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे शेरू आंची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे शेरू यांच्या मुलीने म्हटले आहे शेरू यांना पोलिसांनी अटक केली आहे

भोपाळ - एक फळ विक्रेता थुंकी लावून फळे विकत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सत्य असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून संबंधित फळ विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा फळ विक्रेता मध्य प्रदेशातील रायसेन येथील असून शेरू मियां, असे त्याचे नाव आहे. 

संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश सिंह सिद्धू यांनी सांगितल्यानुसार, फळ विक्रेता शेरू यांचे कुटुंबीय त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगत आहेत. यामुळे त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. पोलिसांनी शेरूविरोधात कलम 269 आणि कलम 270 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शेरू यांच्या विरोधात शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. यानुसार केलेल्या तपासात हा व्हिडिओ खरा असल्याचे सिद्ध झाले आहे. फळांना थुंकी लावण्याचे हे प्रकरण 16 फेब्रुवारीचे आहे. शेरू यांची मुलगी सांगते, की तीच्या वडिलांची मानसिक स्थिती ठीक नाही. एक जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा संबंध कोरोनाशी जोडला जात आहे. शेरू मियांचा हा व्हायरल व्हिडियो सर्वप्रथम 16 फेब्रुवारीला टिकटॉकवर घेणाऱ्या दीपक नामदेव यांनी शुक्रवारी यासंदर्भात तक्रार नोंदवली होती.

बैतूल येथे चाकूला थुंकीलावून कापत होते टरबूज - 

चाकूला थुकी लावून टरबूज विकत असल्याच्या तक्रारीवरून बैतूल बाजार पोलिसांनी तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी अब्दुल रफीक, सादी अहमद आणि रितेश मधाना हे शुक्रवारी सायंकाळी ऑटो रिक्शाने टरबूज विकत होते. प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: fruit trader sent to jail by Madhya pradesh raisen police after the spitting on fruits video found right in investigation sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.