यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, बस उलटल्यानं चार जणांचा मृत्यू, 50 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 09:03 IST2019-06-03T09:02:01+5:302019-06-03T09:03:11+5:30

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे.

Four killed, 50 injured in Yamuna Express bus accident | यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, बस उलटल्यानं चार जणांचा मृत्यू, 50 जखमी

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, बस उलटल्यानं चार जणांचा मृत्यू, 50 जखमी

लखनऊः उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. मथुरातल्या यमुना एक्स्प्रेस हायवेवर मोठा अपघात घडला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50हून अधिक लोक जखमी आहेत. हा अपघात मथुरा जिल्ह्यातील ठाणा बलदेव भागातल्या गडसौली भागात घडला आहे. नोएडातल्या भिंड इथे जात असताना बसचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि रात्री 12.45 दरम्यान ही बस यमुना एक्स्प्रेवर उलटली. या अपघातात चार जणांना प्राणांना मुकावं लागलं आहे. तर 50 प्रवासी जखमी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी जखमींना आग्र्यातील जसवंत रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेनंतर हायवेवर जखमींचा आरडाओरडा सुरू होता. मृतांमधले तिघे जण मध्य प्रदेशमधल्या भिंड जिल्ह्यात वास्तव्याला होते. तर एकाची ओळख पटवण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.  

Web Title: Four killed, 50 injured in Yamuna Express bus accident

टॅग्स :Accidentअपघात