शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ममतांच्या गडाला पुन्हा एकदा मोठं खिंडार?; तृणमूलचे चार बडे नेते आज हाती घेऊ शकतात भाजपचा भगवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 16:10 IST

हे नेते दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात भगवा हाती घेऊ शकतात. यापूर्वी तृणमूलचे मातब्बर नेते सुवेदू अधिकारी यांच्यासह सात आमदारांनी गेल्या महिन्यातच केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान मदिनीपूर येथे भाजपमध्ये प्रेवेश केला होता.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला सातत्याने धक्क्यावर धक्के बसत आहेत. तृणमूल काँग्रेसचे चार बडे नेते आज नवी दिल्ली येथे भाजपचा भगवा हाती घेण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही नेते एका विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. 

यात, नुकताच राजीनामा दिलेले, माजी मंत्री राजीब बॅनर्जी, आमदार तथा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची मुलगी वैशाली दालमिया, आमदार प्रबीर घोषाल आणि हावडा नगरपालिकेचे माजी महापौर रथीन चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

राजधानी दिल्लीत शुक्रवारी इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आपला दोन दिवसीय बंगाल दौरा रद्द केला आहे. 30 आणि 31 जानेवारीला शाह निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगाल दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान तृणमूल काँग्रेसचे अनेक   हेवी वेट नेते भाजपत सामील होण्याची चर्चा होती. मात्र शाह यांचा बंगाल दौरा रद्द झाल्याने हे चारही नेते विमानाने दिल्लीला जात असल्याचे वृत्त आहे.

"बहुमत तुम्हाला लोकांना मारण्याची परवानगी देत नाही", ममता बॅनर्जी संतापल्या

हे नेते दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात भगवा हाती घेऊ शकतात. यापूर्वी तृणमूलचे मातब्बर नेते सुवेदू अधिकारी यांच्यासह सात आमदारांनी गेल्या महिन्यातच केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान मदिनीपूर येथे भाजपमध्ये प्रेवेश केला होता.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जींना धक्का देत नदिया जिल्ह्यातील शांतीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी भाजपत प्रवेश केला. भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह काही नेत्यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. भाजपा मुख्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात भट्टाचार्य यांचे स्वागत करण्यात आले.

आता खुद्द ममता बॅनर्जींच्या घरातच बंडखोरी? भावानं दिले भाजपत जाण्याचे संकेत!

यावेळी, "आज बंगालमधील तरूण बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त आहेत. तरुणांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप त्यांना नोकरी देण्यात आलेली नाही. बंगालमध्ये ममता सरकारकडे कोणतेही व्हिजन नाही. तसेच भविष्यासाठी कोणतीही योजना नाही. भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळेच आता मी आत्मनिर्भर बंगाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारधारेसोबत काम करणार आहे," असे म्हणज अरिंदम भट्टाचार्य यांनी त्यावेळी ममतांवर निशाणा साधला होता.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाdelhiदिल्लीAmit Shahअमित शहा