Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:22 IST2025-09-17T13:21:51+5:302025-09-17T13:22:57+5:30
Jaya Shetty Murder Case: हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.

Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांच्या युक्तिवादानंतर हा आदेश दिला. न्यायालयाने म्हटले की, छोटा राजन इतर चार प्रकरणांमध्ये दोषी ठरला आहे आणि तो २७ वर्षांपासून फरार होता.
सुप्रीम कोर्ट ने जया शेट्टी हत्याकांड में गैंगस्टर छोटा राजन की ज़मानत रद्द की, कहा- 'ऐसे व्यक्ति की सज़ा क्यों स्थगित?'https://t.co/k2rrsUInEd#gangster#chotarajan#supremecourt#livelawpic.twitter.com/mfwcQmV9Z0
— LiveLaw Hindi (@LivelawH) September 17, 2025
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण मुंबईतील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालकीण जया शेट्टीला छोटा राजनच्या टोळीकडून खंडणीच्या धमक्या येत होत्या. तिला पोलिस संरक्षण दिले गेले. परंतु, हत्येच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांचे संरक्षण काढून घेतले. जया शेट्टीने ५०,००० खंडणी देण्यास नकार दिला. त्यानंतर ४ मे २००१ रोजी त्यांच्या कार्यालयाबाहेरच दोन जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
कायदेशीर कारवाईनुसार, छोटा राजनला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) आणि १२०-ब (गुन्हेगारी कट) अंतर्गत जन्मठेपेची आणि ₹१००,००० दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास त्याला एक वर्षाची अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याच्याविरुद्ध मकोका कायद्याच्या कलम ३(१)(i), ३(२), आणि ३(४) अंतर्गत देखील जन्मठेपेची शिक्षा आणि ₹५००,००० दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास, प्रत्येक प्रकरणात एक वर्षाची अतिरिक्त साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
त्याला एकाच वेळी चार जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली, आणि एकूण ₹१६,००,००० दंड ठोठावला. शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३, २५ आणि २७ अंतर्गत छोटा राजन दोषमुक्त ठरला. हे राजनचे दुसरे शिक्षेसंबंधी प्रकरण होते, कारण त्याने २०११ मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी आधीच शिक्षा भोगली आहे. छोटा राजनला ऑक्टोबर २०१५ मध्ये बाली येथून अटक करण्यात आली.केलेल्या खटल्यांचा समावेश आहे.