शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चारधाम महामार्गाची मोदींच्या हस्ते पायाभरणी

By admin | Updated: December 28, 2016 02:30 IST

गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या पवित्र तीर्थांची यात्रा सुकर व आरामदायी करण्यासाठी रस्ते विकासाची मोठी योजना आखण्यात आली असून, त्याची पायाभरणी मंगळवारी

डेहराडून : गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या पवित्र तीर्थांची यात्रा सुकर व आरामदायी करण्यासाठी रस्ते विकासाची मोठी योजना आखण्यात आली असून, त्याची पायाभरणी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. उत्तराखंडला विकासाच्या नव्या उंचीवर नेणार असल्याचे सांगतानाच, राज्यातील युवकांना रोजगारासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही, असा शब्दही मोदी यांनी दिला. नऊ हजार किमीच्या या महामार्गांसाठी १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या मार्गामुळे देशातील वृद्ध भाविक नितीन गडकरी यांना धन्यवाद देतील, अशी स्तुतीही मोदींनी केली.मोदी म्हणाले की, ‘उत्तराखंडच्या डोंगरी भागात असे म्हटले जाते की, येथील पाणीसाठे आणि युवक येथील भूमीची सेवा करू शकत नाहीत. मात्र, हा पायंडा आपण चुकीचा ठरवणार आहोत. येथील लोक परिस्थितीमुळे शहरात जातात आणि खडतर जीवन अपरिहार्यपणे स्वीकारतात. ही परिस्थिती आम्ही आता बदलणार आहोत.’ उत्तराखंडमध्ये भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना त्यातून बाहेर काढण्याचा शब्द मोदी यांनी दिला. राज्याला या समस्यातून बाहेर काढण्यासाठी दुहेरी इंजिनाची गरज आहे. यातील एक केंद्रात तर दुसरे राज्यात असेल, असेही ते म्हणाले. २०१३ मध्ये आलेल्या आपत्तीत चारधाम परिसरात मोठे नुकसान झाले होते. उत्तराखंडमधील मदत निधीतील कथित घोटाळ्याकडे इशारा करून ते म्हणाले की, ‘पाच लीटर इंधन क्षमता असलेली स्कूटरसुद्धा ३५ लीटर इंधन पिऊ शकते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सरकार सत्तेवर आणा आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कल्पनेतील उत्तराखंड निर्माण करण्यासाठी संधी द्या,’ असे आवाहनही त्यांनी केले. (वृत्तसंस्था)