शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

By बाळकृष्ण परब | Updated: September 27, 2020 09:19 IST

भाजपाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएस सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती.

ठळक मुद्देमाजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी नेते जसवंत सिंह यांचे निधन १९९६ ते २००४ दरम्यान त्यांनी संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्राालय अशा मोठ्या खात्यांचे मंत्रिपद भूषवलेजसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला

नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते कोमामध्ये होते. दरम्यान, जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.भाजपाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएस सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. १९९६ ते २००४ यादरम्यान त्यांनी संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्राालय अशा मोठ्या खात्यांचे मंत्रिपद भूषवले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाली साडे आठच्या सुमारास ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. जसवंत सिंह यांची राजकारण आणि समाजाबाबतच्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोनासाठी कायम आठवण काढली जाईल. नरेंद्र मोदींप्रमाणेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विट करत जसवंत सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

  

अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात भारतीय लष्करामधून केली होती. त्यानंतर ते राजकारणात दाखल झाले होते. वाजयपेयी सरकारच्या काळा त्यांची कारकिर्दी शिखरावर होती. दरम्यान, जसवंत सिंह यांनी कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. त्यांनी अने वादविवादांचा सामनाही केला. विशेषकरून १९९९ मध्ये कंधार विमान अपहरणावेळी प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी दहशतवाद्याला घेऊन कंधारला गेल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.

मात्र वाजपेयी सरकारमधील त्यांचं महत्त्व कायम राहिलं. पुढे एनडीएचं सरकार गेल्यानंतर जसवंत सिंह यांनी २००९ पर्यंत राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं. तसेच गोरखालँडची मागणी करणाऱ्या दार्जिंलिंगमधील स्थानिक पक्षांच्या पाठिंब्यावर ते लोकसभेवर निवडून गेले होते.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे

टॅग्स :PoliticsराजकारणIndiaभारतRajasthanराजस्थान