Former Union Minister Jaswant Singh passes away | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

ठळक मुद्देमाजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी नेते जसवंत सिंह यांचे निधन १९९६ ते २००४ दरम्यान त्यांनी संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्राालय अशा मोठ्या खात्यांचे मंत्रिपद भूषवलेजसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला

नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते कोमामध्ये होते. दरम्यान, जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.

भाजपाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएस सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. १९९६ ते २००४ यादरम्यान त्यांनी संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्राालय अशा मोठ्या खात्यांचे मंत्रिपद भूषवले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाली साडे आठच्या सुमारास ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. जसवंत सिंह यांची राजकारण आणि समाजाबाबतच्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोनासाठी कायम आठवण काढली जाईल. नरेंद्र मोदींप्रमाणेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विट करत जसवंत सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

  

अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात भारतीय लष्करामधून केली होती. त्यानंतर ते राजकारणात दाखल झाले होते. वाजयपेयी सरकारच्या काळा त्यांची कारकिर्दी शिखरावर होती. दरम्यान, जसवंत सिंह यांनी कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. त्यांनी अने वादविवादांचा सामनाही केला. विशेषकरून १९९९ मध्ये कंधार विमान अपहरणावेळी प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी दहशतवाद्याला घेऊन कंधारला गेल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.

मात्र वाजपेयी सरकारमधील त्यांचं महत्त्व कायम राहिलं. पुढे एनडीएचं सरकार गेल्यानंतर जसवंत सिंह यांनी २००९ पर्यंत राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं. तसेच गोरखालँडची मागणी करणाऱ्या दार्जिंलिंगमधील स्थानिक पक्षांच्या पाठिंब्यावर ते लोकसभेवर निवडून गेले होते.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे

English summary :
Former Union Minister Jaswant Singh passes away

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Former Union Minister Jaswant Singh passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.