शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

...म्हणून मी ट्विटरवर नाही- रघुराम राजन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 7:43 PM

सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आर्थिक धोरणांचे विश्लेषण करण्यासाठी ते प्रसिद्ध होते.

कोची: सध्याच्या घडीला ट्विटर अकाऊंट असणे, हे एकप्रकारचे स्टेटस सिम्बॉल मानले जाते. अनेक कंपन्या आणि प्रसिद्ध व्यक्ती महत्त्वाच्या घोषणांसाठी ट्विटरचे व्यासपीठ वापरतात. मात्र, काही मोजक्या व्यक्ती याला अपवाद आहेत, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हेदेखील त्यांच्यापैकी एक. सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आर्थिक धोरणांचे विश्लेषण करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर अकाऊंटसच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी भर पडली होती. मात्र, असे असूनही स्वत: रघुराम राजन यांचे ट्विटर अंकाऊट नसल्याबद्दल अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. नुकत्याच कोचीत झालेल्या एका कार्यक्रमात रघुराम राजन यामागील कारण स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, माझ्याकडे या सगळ्यासाठी फारसा वेळ नसतो. एकदा का तुम्ही ट्विटर वा तत्सम सोशल मीडियाचा वापर करायचे ठरवले, तर तुम्हाला त्याठिकाणी सातत्याने वेळ द्यावा लागतो. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ट्विटरवर पटकन व्यक्त होण्यासाठी जे कौशल्य लागते, ते माझ्याकडे नाही. मी अवघ्या 20 ते 30 सेकंदांमध्ये 140 शब्द लिहू शकत नाही, असे राजन यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी रघुराम राजन राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. आम आदमी पक्षाकडून त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती. परंतु, राजन स्वत:हूनच ही ऑफर नाकारल्याचे स्पष्ट केले होते. मी जेव्हा आरबीआयमध्ये होतो, त्यावेळी लोकांना वाटायचं की मी आयएमएफमध्ये परत जावं. माझ्याजवळ एक चांगला मेंदू आहे, जो दिवसातील अनेक तास काम करतो. ही एक नोकरी आहे आणि ती मला आवडते. राजकारणात येण्याला माझा नकार आहे. राजकारणात जाण्यास पत्नीने स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवल्याचेही राजन यांनी सांगितले होते.  

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनTwitterट्विटर