Atal Bihari Vajpayee: वाजपेयींचं निधन म्हणजे एका युगाचा अंत; मोदींनी वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:02 IST2018-08-16T18:01:54+5:302018-08-16T18:02:57+5:30
वाजपेयींच्या निधनानं देश शोकसागरात

Atal Bihari Vajpayee: वाजपेयींचं निधन म्हणजे एका युगाचा अंत; मोदींनी वाहिली श्रद्धांजली
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशातील पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होण्याचा मान वाजपेयींनी मिळवला. त्यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वाजपेयी यांचं निधन म्हणजे एका युगाचा अंत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.
मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है।
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2018
हम सभी के श्रद्धेय अटल जी हमारे बीच नहीं रहे। अपने जीवन का प्रत्येक पल उन्होंने राष्ट्र को समर्पित कर दिया था। उनका जाना, एक युग का अंत है।
अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती कालपासून अतिशय चिंताजनक होती. त्यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी दोनवेळा एम्स रुग्णालयात गेले होते. आज संध्याकाळी वाजपेयी यांचं निधन झाल्यानंतर मोदींनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 'मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है,' अशा शब्दांमध्ये मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे. ट्विटरवरुन मोदींनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. 'आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेले अटलजी आता आपल्यात नाहीत. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांनी राष्ट्राला समर्पित केला होता. त्यांचं जाणं हा एका युगाचा अंत आहे,' अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.