शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या मोठ्या भावाचं निधन; वयाच्या १०४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 09:24 IST

अब्दुल कलाम यांच्या मोठ्या भावाचं वृद्धापकाळानं निधन; रामेश्वरममधल्या राहत्या घरी प्राणज्योत मालवली

नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांचे मोठे बंधू मोहम्मद मुथू मीरा लेब्बई मरैकयार (Mohammed Muthu Meera Lebbai Maraikayar) यांचं तामिळनाडूतल्या रामेश्वरममध्ये निधन झालं. मोहम्मद यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते १०४ वर्षांचे होते. वयोवृद्ध असल्यानं मोहम्मद काही आजारांचा सामना करत होते. याशिवाय त्यांच्या एका डोळ्याला संसर्गदेखील झाला होता. काल संध्याकाळी साडे सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.मोहम्मद यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांच्या पत्नीचं आधीच निधन झालं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम आणि द्रमुख अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. मोहम्मद आणि अब्दुल कलाम यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. अब्दुल कलाम यांचे वडील नाविक म्हणून काम करायचे. मासेमारी करणाऱ्यांना होडी भाड्यानं देऊन त्यांची गुजराण व्हायची. कलाम यांचं बालपण अतिशय कष्टाचं आणि संघर्षाचं होतं. पाच भाऊ आणि पाच बहिणी असलेलं कुटुंब चालवण्यासाठी कलाम यांच्या वडिलांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला.