‘फुटीर’ आमदार पंतप्रधानांच्या भेटीच्या प्रतीक्षेत, दिल्लीत पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 05:57 IST2022-09-20T05:57:05+5:302022-09-20T05:57:50+5:30

दिगंबर कामत म्हणाले, की आम्ही सर्वजण दिल्लीत आलो आहोत

'Footir' MLAs waiting for Prime Minister's visit, Says by digamber kaamat | ‘फुटीर’ आमदार पंतप्रधानांच्या भेटीच्या प्रतीक्षेत, दिल्लीत पोहोचले

‘फुटीर’ आमदार पंतप्रधानांच्या भेटीच्या प्रतीक्षेत, दिल्लीत पोहोचले

सुरेश भुसारी

नवी दिल्ली : काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह आठ आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. परंतु त्यांना सोमवारी सायंकाळपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीची वेळ दिलेली नाही. यामुळे एका हॉटेलमध्ये हे सर्व आमदार निरोपाची प्रतीक्षा करीत आहेत.

दिगंबर कामत म्हणाले, की आम्ही सर्वजण दिल्लीत आलो आहोत. भाजपत प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याची इच्छा आहे. यासाठी दिल्लीत आलेलो आहोत. परंतु अद्यापही पीएमओकडून भेटीची वेळ मिळालेली नाही. गोव्यातील राजकीय स्थितीबद्दल चर्चा करू. याशिवाय दुसरा कोणताही अजेंडा नसल्याचे कामत यांनी स्पष्ट केले. 

 

Web Title: 'Footir' MLAs waiting for Prime Minister's visit, Says by digamber kaamat