धावत्या स्कुलबसची प्लोरिंग सरकली; 6 वर्षीय चिमुकली चाकाखाली अडकल्याने जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 15:19 IST2026-03-01T15:18:55+5:302026-03-01T15:19:13+5:30

भावाच्या डोळ्यासमोर सोडला जीव...

floor of a running school bus slipped; a 6-year-old child died on the spot after being trapped under the wheels | धावत्या स्कुलबसची प्लोरिंग सरकली; 6 वर्षीय चिमुकली चाकाखाली अडकल्याने जागीच मृत्यू

धावत्या स्कुलबसची प्लोरिंग सरकली; 6 वर्षीय चिमुकली चाकाखाली अडकल्याने जागीच मृत्यू

Uttar Pradesh :उत्तर प्रदेशातील अलीगड-कासगंज मार्गावर शनिवारी दुपारी एक हृदयद्रावक अपघात घडला. माउंट इंटरनॅशनल शाळेच्या अतिशय जीर्ण झालेल्या बसचे फ्लोरिंग(सीटखालील पत्रा) तुटल्याने यूकेजीमध्ये शिकणारी 6 वर्षीय चिमुकली बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. दुःखद बाब म्हणजे, ही धक्कादायक घटना तिच्या मोठ्या भावाच्या (इयत्ता तिसरी) डोळ्यांसमोर घडली.

नेमकं काय घडलं? 

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बस ढोलना परिसरात पोहोचली असताना अनन्या ज्या सीटवर बसली होती, त्या सीटखालील फ्लोरिंग अचानक तुटली अन् क्षणातच अनन्या बसखाली पडली. हे पाहताच तिचा भाऊ गोलू जोरजोरात ओरडू लागला. चालकाने बस थांबवली, मात्र तोपर्यंत अनन्या बसच्या मागील टायरखाली चिरडली गेली होती.

चालकाची निष्काळजीपणा; ग्रामस्थांचा संताप

अपघातानंतर चालकाने रक्तबंबाळ अवस्थेतील अनन्याला बसच्या मागील सीटवर झोपवून कुटुंबीयांना केवळ ‘जखमी’ झाल्याची माहिती दिली. मात्र प्रत्यक्षात मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच ग्रामस्थांचा संताप उसळला. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला लोकांनी पकडले. घटनेची माहिती मिळताच अनेक पोलीस ठाण्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले अन् परिस्थिती नियंत्रणात आणली.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अनन्याचे वडील रवी हे गंगीरी चौकात जनसेवा केंद्र चालवतात. आपल्या चिमुकलीच्या मृत्यूची बातमी कळताच ते बेशुद्धावस्थेत गेले. भावासोबत उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्ने पाहणारी अनन्या शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कायमची हरपली, अशी भावना ग्रामस्थ आणि पालक व्यक्त करत आहेत. 

प्रशासकीय कारवाई; शाळेचा बचावात्मक पवित्रा

सीओ संजीव कुमार यांनी सांगितले की, हा अपघात कासगंज जिल्ह्यातील ढोलना पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने मृतदेह पोस्टमार्टमसाठी तिथे पाठवण्यात आला आहे. अनन्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशी सुरू आहे. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने या घटनेला ‘अपघात’ म्हणत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title : स्कूल बस का फर्श धंसा; 6 वर्षीय बच्ची की पहियों के नीचे दर्दनाक मौत।

Web Summary : उत्तर प्रदेश में, एक स्कूल बस का फर्श धंसने से 6 वर्षीय बच्ची की मौत हो गई। बच्ची अपने भाई के सामने पहियों के नीचे गिर गई। ग्रामीणों ने लापरवाह ड्राइवर को पकड़ लिया। पुलिस स्कूल प्रबंधन की जांच कर रही है।

Web Title : School bus floor collapses; 6-year-old dies tragically under wheels.

Web Summary : In Uttar Pradesh, a school bus floor collapsed, killing a 6-year-old girl. The child fell under the wheels in front of her brother. Villagers caught the negligent driver. Police are investigating the school management after public outrage.