राजस्थानच्या वाळवंटात पूर तर काही राज्ये पाण्यासाठी तरसली; भारतात पावसाचा पॅटर्न बदलतोय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 04:23 PM2022-08-24T16:23:59+5:302022-08-24T16:24:43+5:30

भारतात मान्सूनचा पॅटर्न झपाट्याने बदलतोय, ज्यामुळे एकतर कमी वेळेत जास्त पाऊस पडतोय किंवा अजिबात पडत नाहीये.

Floods in the deserts of Rajasthan but some states thirsty for water; Rain pattern is changing in India..? | राजस्थानच्या वाळवंटात पूर तर काही राज्ये पाण्यासाठी तरसली; भारतात पावसाचा पॅटर्न बदलतोय..?

राजस्थानच्या वाळवंटात पूर तर काही राज्ये पाण्यासाठी तरसली; भारतात पावसाचा पॅटर्न बदलतोय..?

Next


नवी दिल्ली: सध्या मध्य प्रदेशात पावसाने थैमान घातले आहे, गेल्या तीन दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. राजधानी भोपाळमधील परिस्थिती अनियंत्रित झाली असून, मोठा तलाव पूर्णपणे भरला आहे. तलावात उभ्या असलेल्या बोटी वादळामुळे बुडण्याची भीती आहे. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्येही घडत आहे. बहुतांश धरणे, नद्या, तलाव भरले आहेत. पाऊस इतका पडला की पुढच्या वर्षी पाऊस पडला नाही तरी दुष्काळ पडणार नाही.

या राज्यात कमी पाऊस
पण, तिकडे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडसह अनेक राज्ये पाण्यासाठी आसुसलेली आहेत. पिकांचे नुकसान झाल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 75 पैकी 64 म्हणजेच 85% जिल्हे असे आहेत, जिथे सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मान्सून आपला पॅटर्न कसा बदलतोय, हे अशा पद्धतीने समजून घ्या की, एकीकडे मध्य प्रदेश ओलाचिंब होत आहे, पण लगतचा उत्तर प्रदेश मात्र पाण्यासाठी तडफडत आहे. तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, मात्र लगतच्या केरळमध्ये अजूनही पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही.

अनेक राज्यांत मुसळधार
जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे भारतात मान्सूनचे हंगाम आहेत, त्याला दक्षिण पश्चिम मान्सून म्हणतात. भारताच्या वार्षिक पावसाची सुमारे 75% गरज नैऋत्य मान्सूनद्वारे भागवली जाते. त्यामुळे हे चार महिने पावसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण, या चार महिन्यांत अशी काही राज्ये आहेत ज्यांच्यावर ढग दयाळू आहेत. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये इतका पाऊस झाला की, पूर आणि भूस्खलनामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हिमाचलमध्ये आतापर्यंत फक्त सामान्य पाऊस झाला आहे. मात्र कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने नैसर्गिक घटना वाढल्या आहेत.

वाळवंटात मुसळधार
अधिकाऱ्यांनी सांगितले की, 20 ऑगस्टपर्यंत राजस्थानमधील 716 धरणे त्यांच्या क्षमतेच्या 76% पाण्याने भरली आहेत. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत केवळ 57 टक्के पाणी भरले होते. यंदा एवढा पाऊस पडल्याने पुढील वर्षी पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी 23 ऑगस्टपर्यंत राजस्थानमध्ये सामान्यपेक्षा 51% जास्त पाऊस झाला आहे. येथील एकही जिल्हा कोरडा नाही. ओडिशात काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरापासून दिलासा मिळालेला नाही. नद्यांची पातळी कमी होत आहे, मात्र तरीही 902 गावांतील साडेसहा हजार लोक बाधित आहेत. राज्यातील जवळपास सर्वच नद्या धोक्याच्या पातळीखाली वाहत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 

Web Title: Floods in the deserts of Rajasthan but some states thirsty for water; Rain pattern is changing in India..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.