अशोकस्तंभावर फ्लॅटला आग

By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:00+5:302015-03-08T00:31:00+5:30

अग्निशामक दलाची तत्परता : गॅस सिलिंडर सुरक्षित हलविल्याने टळला अनर्थ

Flat fire on ashokastambha | अशोकस्तंभावर फ्लॅटला आग

अशोकस्तंभावर फ्लॅटला आग

्निशामक दलाची तत्परता : गॅस सिलिंडर सुरक्षित हलविल्याने टळला अनर्थ
जुने नाशिक : अशोकस्तंभ परिसरातील गाोखले पार्क संकुलामधील दुसर्‍या मजल्यावरील एका फ्लॅटला शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथील अग्निशामक मुख्यालयातील बंब घटनास्थळी क्षणार्धात पोहचला. जवानांनी तातडीने घराच्या बाल्कनीत लागलेल्या आगीतून दोन गॅस सिलिंडर प्रथम बाहेर काढल्याने अनर्थ टळला.
अशोकस्तंभ येथील गोखले पार्क संकुलामधील दुसर्‍या मजल्यावर असलेल्या राम पद्म शाही यांचे फ्लॅट आहे. सकाळी आग लागण्याच्या काही मिनिटांपूर्वीच राम खाली दुकानात काही साहित्य खरेदीसाठी बाहेर पडले होते. यावेळी त्यांचा मुलगा गौरव (वय ८) घरात एकटाच सोफ्यावर बसून टीव्ही बघत होता. दरम्यान, टीव्ही अचानकपणे बंद झाला व बैठक खोलीला जोडून असलेल्या बाल्कनीतून धूर येऊ लागल्याने गौरव घाबरला. त्याने तत्काळ बाल्कनीचा दरवाजा खोलीतून ओढून घेत बाहेर पळ काढला. यावेळी शेजार्‍यांच्या सदर बाब गौरवने लक्षात आणून दिल्यानंतर रहिवाशांपैकी अमोल देवरे यांनी तत्काळ अग्निशामक केंद्राला घटनेची माहिती कळविली. माहिती मिळताच सब ऑफिसर दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक जयंत सांत्रस यांनी तत्काळ मुख्यालयातून बंब अशोकस्तंभाच्या दिशेने दामटविला. अवघ्या पाच ते आठ मिनिटांत बंब घटनास्थळी पोहचला. अग्निशामक दलाचे जवान प्रदीप परदेशी, यशवंत मोरे, मंगेश पिंपळे, किशोर पाटील यांनी थेट दुसर्‍या मजल्यावर पाण्याचा होज नेऊन आग विझविली. तसेच बाल्कनीत आगीच्या वेढ्यात असलेल्या दोन सिलिंडर सुरक्षितरीत्या सर्वप्रथम बाहेर काढले व पाण्याचा मारा करून बाल्कनीत पेट घेतलेल्या फायली प्लॅस्टिकचा पत्रा आदि साहित्य विझवून आग शमविली.
इन्फो.......
दैव बलवत्तर.....
फ्लॅटच्या बाल्कनीत लागलेली आग गौरवच्या तत्काळ लक्षात आल्यानंतर त्याने तत्काळ घरातून बाहेर पळ काढला. अग्निशामक दलाचे जवान पोहचेपर्यंत बाल्कनीत ठेवलेल्या गॅस सिलिंडरला कु ठलीही हानी पोहचली नाही केवळ सिलिंडर काळे होऊन तापले होते; मात्र त्यामधून इंधनाची गळती झाली नसल्याने आगीने रुद्रावतार धारण केला नाही. जवानांनी आग तत्काळ आटोक्यात आणत सिलिंडरवर पाण्याचा मारा केला. एकूणच शाही कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांचे दैव बलवत्तर असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

फोटो कॅप्शन : ०७ पीएचएमआर ६५ : आगीत तापलेल्या सिलिंडरवर पाण्याचा मारा करताना जवान.

फोटो क्रमांक ८३/८४/८५/८६

Web Title: Flat fire on ashokastambha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.