शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

VIDEO: शत्रूंना धडकी भरवणारी राफेल विमानं भारतात दाखल; अंबाला हवाईतळावर लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 3:30 PM

Rafale fighter jets: सात हजार किलोमीटर अंतर कापून राफेल विमानं भारतात

अंबाला: अंबाला: भारताच्या सामर्थ्यात मोलाची भर घालणारी, शत्रूंनी धडकी भरवणारी राफेल विमानं (Rafale Fighter Jets In India) हरयाणाच्या अंबालात दाखल झाली आहेत. तब्बल सात हजार किलोमीटरचं अंतर कापून राफेल विमानं भारतात आली आहेत. चीनच्या सीमेवरील वाढता तणाव पाहता भारतानं फ्रान्सकडे राफेल विमानं लवकर पाठवण्याची मागणी केली. भारताच्या मागणीला फ्रान्सनं सकारात्मक प्रतिसाद दिला. अखेर आज पाच राफेल विमानं भारतात दाखल झाली आहेत. हवाई दलाच्या अंबाला तळावर राफेल विमानांनी शानदार लँडिंग केलं आहे. गेल्या ३ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये तणाव वाढला आहे. सीमावर्ती भागात चीनच्या कुरघोड्या सुरूच आहेत. ही परिस्थिती पाहता भारतानं राफेल विमानांचा ताबा लवकर देण्याची विनंती फ्रान्सला केली होती. त्यानंतर लगेचच फ्रान्सनं ५ राफेल विमानांची पाठवणी केली. दुपारी साडे तीनच्या सुमारास या विमानांनी अंबालामध्ये लँडिंग केलं आहे. त्या क्षणांचा व्हिडीओ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेअर केला आहे. राफेलमुळे भारताचं लष्करी सामर्थ्य वाढणार आहे. कोणत्याही मोहिमेवर जाण्याची क्षमता राफेलमध्ये आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील सध्याच्या तणावपूर्ण स्थितीत राफेल विमानं निर्णायक आणि परिणामकारक कामगिरी बजावू शकतात.फ्रान्सनं पहिल्या टप्प्यात भारताला ५ राफेल विमानं दिली आहेत. या विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश करताच 2 SU30 MKIs विमानांनी त्यांच्या एस्कॉर्टसाठी उड्डाण केलं. ही सात विमानं आकाशात उड्डाण करतानाच सुंदर व्हिडीओ संरक्षणमंत्र्यांनी ट्विटरवर शेअर केला होता. राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होताच त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत. अंबाला हवाई तळावर भारतीय हवाई दलाची ही नवीन राफेल लढाऊ विमानं तैनात केली जाणार आहेत. अंबाला हवाई तळाचं सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. अंबालापासून चीन आणि पाकिस्तान अतिशय जवळ आहेत. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये अंबालातून आकाशात झेपावून राफेल विमानं शत्रूवर तुटून पडू शकतात.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलRafale Dealराफेल डील