शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

आधी अतिरेकी हल्ला, नंतर पुराचा हाहाकार

By admin | Updated: September 10, 2014 03:11 IST

आधी अतिरेकी हल्ला आणि नंतर पुरामुळे उडालेला हाहाकार यातून मरणाशी दोनहात करून एकाच कुटुंबातील तिघे जण मुंबईत सुखरूप परतले आहेत

मनीष म्हात्रे , मुंबईआधी अतिरेकी हल्ला आणि नंतर पुरामुळे उडालेला हाहाकार यातून मरणाशी दोनहात करून एकाच कुटुंबातील तिघे जण मुंबईत सुखरूप परतले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.चेंबूर कॅम्पमध्ये राहणारे विजय ठाकूर आणि त्यांची पत्नी सविता परिचितांच्या विवाहासाठी श्रीनगरला गेले होते. या वेळी त्यांच्यासोबत कौटुंबिक मित्र अमित ओबेरॉय, पिंकी ओबेरॉय, त्यांची मुलगी रिया आणि बंटी हुडा, कांचन हुडा व त्यांंचा मुलगा पृथ्वी हे देखील होते. २ सप्टेंबरला कॉलेजमधील मैत्रिणीचे लग्न असल्याने हे सर्व कुटुंबीय ३० आॅगस्टलाच श्रीनगरकडे रवाना झाले. या वेळी सविताने विक्रोळीमध्ये राहणाऱ्या तिच्या आई-बाबांना श्रीनगरला उतरल्यावर कॉलही केला होता. लग्नसोहळ्यानंतर काही दिवस जम्मू-काश्मीरमध्ये घालवण्याच्या विचारात त्यांनी श्रीनगर परिसरातील कोहलीज हॉटेलमध्ये बुकिंग केले होते, मात्र लग्नसोहळ्याच्या दिवशीच ते अतिरेक्यांच्या जाळ्यात अडकले. लग्नस्थळी अतिरेकी घुसल्याच्या सविताच्या कॉलने तिच्या आई-वडिलांची-कांबळे कुटुंबीयांची झोपच उडाली. मात्र त्यातून ते सुखरूप बाहेर निघाल्याचे समजताच त्यांच्या जिवात जीव आला. त्यातून सुटका होते न् होते तोच काश्मीरमधल्या पुराने त्यांना गाठले. त्यामुळे घरी परतणे शक्यच नसल्याचे सविताने कळवले. त्यांचे कुटुंबीय त्यांना मदत करण्यासाठी धडपडत होते, मात्र संपर्क होत नव्हता. नंतर मात्र सविताचा कॉल आला आणि कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ते मुंबईत दाखल झाल्याने कुटुंबीय निश्चिंत झाले. (प्रतिनिधी)