IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:41 IST2025-11-20T17:40:38+5:302025-11-20T17:41:16+5:30
First Gen Z Post Office: देशातील आणखी 46 विद्यापीठांमध्ये ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ सुरू होणार.

IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
First Gen Z Post Office: भारतीय टपाल विभागाने देशातील पोस्ट ऑफिस आधुनिक आणि युवाकेंद्रित करण्याच्या उद्देशाने मोठे पाऊल टाकले आहे. या उपक्रमांतर्गत IIT दिल्लीच्या परिसरात देशातील पहिले ‘Gen-Z थीम’ असलेले पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले आहे. संचार मंत्रालयाने या उपक्रमाला आपल्या मॉडर्नायझेशन मिशनचा महत्त्वाचा भाग म्हटले आहे.
विद्यार्थ्यांसोबत मिळून तयार केलेले डिझाइन
IIT दिल्लीतील हे पोस्ट ऑफिस पूर्णतः नव्या लूकमध्ये सजवण्यात आले असून, त्याचे डिझाइन विद्यार्थ्यांच्या थेट सहभागातून तयार करण्यात आले आहे. या पोस्ट ऑफिसमध्ये, मॉडर्न इंटीरियर, वाय-फाय झोन आणि विविध ग्राफिटीचा वापर केला आहे.
India Post Unveils First Revamped Gen Z–Themed Campus Post Office at IIT Delhi Campus
— PIB India (@PIB_India) November 19, 2025
The revamped Campus Post Office at #IIT Delhi represents a complete reimagining of postal engagement within educational institutions
This transformation is part of a national initiative… pic.twitter.com/X6qpMSxWio
QR-आधारित सेवा
विद्यार्थ्यांसाठी स्पीड पोस्टवर विशेष डिस्काउंट, QR कोडद्वारे पार्सल बुकिंग आणि स्मार्ट सर्विस टचपॉइंट्स अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे Gen-Z पोस्ट ऑफिस डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असून यामध्ये कॅशलेस व्यवहार आणि त्वरित पोस्टल सुविधा यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. IIT परिसरातील 10,000 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि कर्मचारी याचा लाभ घेणार आहेत.
देशातील आणखी 46 विद्यापीठांमध्ये ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’
टपाल विभागाने जाहीर केले की, 15 डिसेंबर 2025 पर्यंत देशभरातील 46 विद्यापीठ कॅम्पस मध्ये पोस्ट ऑफिसचे Gen-Z मॉडेलमध्ये रुपांतर केले जाईल. याचा उद्देश पोस्ट ऑफिस अधिक आकर्षक बनवणे, युवांकडे पोस्टल सेवांचे आकर्षण वाढवणे आणि तंत्रज्ञानाधारित पोस्ट सेवा उपलब्ध करणे असा आहे.
पहिल्यांदाच ‘स्टूडेंट फ्रँचायझी मॉडेल’
Gen-Z पोस्ट ऑफिस प्रकल्पाची सर्वात मोठी खासियत म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग. पोस्ट ऑफिसमध्ये IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना ब्रँड अॅम्बेसेडर, डिझाइन प्रोड्यूसर आणि सोशल मीडिया सहयोगी म्हणून संधी देण्यात आली आहे. यासोबतच पहिल्यांदाच ‘स्टूडेंट फ्रँचायझी मॉडेल’ सुरू करण्यात आले असून, विद्यार्थी पोस्ट ऑफिस कसे चालते याचा अनुभव घेऊ शकणार आहेत.