शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

"आधी सर्वाना जात विचारायचे अन् आता...": हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींना विचारला गोंधळात टाकणारा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 09:46 IST

मुख्यमत्री सरमा म्हणाले, जात न विचारता जातनिहाय जनगणना होईल का? ते (राहुल गांधी) म्हणतात, मी जातनिहाय जनगणना करेन, मात्र स्वतःची जात सांगणार नाही. असे कसे चालेल?

काँग्रेस खासदार तथा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्या जातीसंदर्भात लोकसभेपासून सुरू झालेल्या वादात आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही उडी घेतली आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी (2 ऑगस्ट 2024) झारखंडमध्ये या मुद्द्यावर भाष्य केले आहे. "पूर्वी राहुल गांधी पत्रकारांना त्यांची जात विचारत होते. आता जेव्हा लोक त्यांना त्यांच्या जातीबद्दल विचारत आहेत, तेव्हा त्यांना त्रास होत आहे," असे सरमा यांनी म्हटले आहे.

मुख्यमत्री सरमा म्हणाले, जात न विचारता जातनिहाय जनगणना होईल का? ते (राहुल गांधी) म्हणतात, मी जातनिहाय जनगणना करेन, मात्र स्वतःची जात सांगणार नाही. असे कसे चालेल? जर जातनिहाय जनगणना झाली तर राहुल गांधींनाही स्वतःची जात सांगावी लागेल.

लोकसभे सुरू झाली होती चर्चा - महत्वाचे म्हणजे, राहुल गांधी यांच्या जातीची चर्चा गेल्या तीन दिवसांपूर्वी लोकसभेत सुरू झाली होती. तेव्हा भाजपा खासदार अनुराग ठाकूर म्हणाले होते, "ज्यांना आपली जात माहीत नाही, ते जातनिहाय जनगणनेच्या गप्पा मारत आहेत." त्यांच्या या विदानावरून सभागृहात बराच गदारोळ झाला होता. यावर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही आक्षेप घेत आपण जात कशी विचारू शखता? असा सवाल केला होता. याशिवाय, विरोधकांनीही आक्रमक होत, अनुराग ठाकूर यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

यानंतर, अनुराग ठाकूर यांनी अखिलेश यादव यांना एक व्हिडिओच्या माध्यमाने प्रत्युत्तर दिले होते. अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर दिखावूपणा आणि सत्य असा उल्लेख करत अखिलेश यादव यांचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमधील एका बाजूला अखिलेश यादव यांनी नुकतेच केलेले विधान दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला ते काही पत्रकारांशी साधलेल्या संवादात जात विचारताना दिसत आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस