आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:10 IST2025-07-14T14:45:59+5:302025-07-14T15:10:42+5:30

उत्तर प्रदेश येथील छांगूर बाबा याचा आलिशान बंगला प्रशासनाने पाडला. आता प्रशासन पाडण्याचा खर्च छांगूर बाबाकडून वसूल करणार आहे.

First, a house worth crores of rupees was demolished, now the administration will recover Rs 8 lakh 55 thousand from Chhangur Baba for the demolition cost | आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार

आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार

उत्तर प्रदेशातील छांगूर बाबा याने अनेक महिलांना फसवल्याचे समोर आले. या प्रकरणी प्रशासनाने कारवाई केली. छांगूर बाबा याचा आलिशान बंगला प्रशासनाने पाडला. आता बंगला पाडण्याचा खर्चही शासन बाबाकडूनच वसूल करणार आहे. बाबाच्या हवेलीवरील या पाडण्याच्या कारवाईनंतर, त्यावर वसूलीची नोटीस चिकटवली जाणार आहे. कारण, सरकारी जमिनीवर बांधलेल्या भाग पाडण्यात आलेला खर्च त्याच्याकडून वसूल केला जाणार आहे.

उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्हा प्रशासनाने या पाडकाम केल्याच्या ठिकाणी वसुलीची नोटीस चिकटवली आहे. पाडण्यासाठी आलेल्या खर्चात जेसीबीचा खर्च, सुरक्षेत असलेल्या पोलिसांचा तीन दिवसांचा पगार आणि इतर खर्चाचा समावेश आहे. ही रक्कम ८ लाख ५५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 

छांगूर बाबाच्या हवेलीचा बराचसा भाग जमीनदोस्त झाला होता, तो एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हता. संपूर्ण हवेली सीसीटीव्हीने सुसज्ज होती. या बंगल्यामध्ये एक खासगी वीज प्रकल्प बसवण्यात आला होता. डझनभर सौर पॅनेल देखील बसवण्यात आले होते. इतकेच नाही तर घराच्या बाजूने काटेरी तारा लावण्यात आली होती.

बंगल्याच्या बाजूच्या तारांमधून करंट सुरू होता

बाबाच्या बंगल्याजवळ कोणीही येऊ नये म्हणून कंपाऊंडच्या तारांमधून करंट सोडण्यात आला होता. हवेलीच्या आत एक गुप्त नियंत्रण कक्ष देखील होता, यातून संपूर्ण घराचे सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रित केले जात होते आणि हे नियंत्रण कक्ष बाबाच्या बेडरूममध्ये होते. आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे रेकॉर्डिंग त्यात केले जात असायचे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी आधीच छांगूर बाबा, त्याची जवळची मैत्रीण नीतू रोहरा, नीतूचा पती जलालुद्दीन आणि बाबाचा मुलगा यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. एटीएस आणि ईडी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: First, a house worth crores of rupees was demolished, now the administration will recover Rs 8 lakh 55 thousand from Chhangur Baba for the demolition cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.