शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

शाहीन बाग परिसरात गोळीबार; आरोपी म्हणाला, देशात फक्त हिंदूंचाच दबदबा राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 6:57 PM

जामियानंतर शाहीन बाग परिसरात गोळीबार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावरील गोळीबाराची घटना ताजी असताना आज शाहीन बाग परिसरात गोळीबार झाला. आंदोलन स्थळापासून काही अंतरावर एका व्यक्तीनं हवेत गोळीबार केला. आरोपीनं दोन-तीन गोळ्या झाडल्या. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. आमच्या देशात केवळ हिंदूंचा दबदबा राहील. इतर कोणाचाही नाही, असं या व्यक्तीनं पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर म्हटलं. आरोपीनं स्वत:चं नाव कपिल गुर्जर असल्याचं सांगितलं. तो नोएडाच्या सीमेवरील दल्लुपुराचा रहिवासी आहे. कपिलनं हवेत गोळीबार केल्यानंतर लगेचच त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त चिन्मय विस्वाल यांनी दिली. कपिलला सरिता विहार पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेताच कपिलनं जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं कपिलला तू गोळी का झाडलीस, असा प्रश्न विचारला. त्यावर आपल्या देशात असं काही व्हावं असं वाटत नाही. आपला देश हिंदू राष्ट्रवादी आहे, असं उत्तर कपिलनं दिलं. गुरुवारी (परवा) जामिया नगरमध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे विद्यार्थी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा काढला होता. यावेळी एका अल्पवयीन मुलानं मोर्चावर गोळीबार केला. यामध्ये जामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना हा प्रकार घडला. यानंतर दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकFiringगोळीबारjamia protestजामिया