सणांसाठी फटाके तयार करत होते, फॅक्टरीला आग, पाच ठार, २० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 13:47 IST2023-07-29T13:46:44+5:302023-07-29T13:47:18+5:30
अनेकजण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सणांसाठी फटाके तयार करत होते, फॅक्टरीला आग, पाच ठार, २० जखमी
कृष्णगिरी : अनेक ठिकाणी सणवार, वाढदिवस, लग्न किंवा नेत्यांच्या आगमनासाठी मोठ्या प्रमाणावर फटाके वाजविले जातात. आता सणाचे दिवस येत आहेत. यासाठी फटाके बनविणाऱ्या फटाका फॅक्टरीमध्ये स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
तामिळनाडूच्या कृष्णगिरीमध्ये ही घटना घडली आहे. जखमींना कृष्णगिरीच्या सरकारी कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. फटाक्यांचा हा स्फोट एवढा शक्तीशाली होता की आजुबाजुच्या तीन चार घरांचे नुकसान झाले आहे. काहीजण या इमारतीखाली अडकले असल्याचे सांगितले जात आहे.
अनेकजण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.