दुसऱ्या दिवशीही महाकुंभमध्ये आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 06:43 IST2025-01-21T06:43:18+5:302025-01-21T06:43:32+5:30
Prayagraj: सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी महाकुंभच्या सेक्टर-१६ मध्ये किन्नर आखाड्याच्या समोर एका तंबूला आग लागली. परंतु, ही आग भडकण्याआधीच विझवण्यात आल्याने अनर्थ टळला.

दुसऱ्या दिवशीही महाकुंभमध्ये आग
प्रयागराज - सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी महाकुंभच्या सेक्टर-१६ मध्ये किन्नर आखाड्याच्या समोर एका तंबूला आग लागली. परंतु, ही आग भडकण्याआधीच विझवण्यात आल्याने अनर्थ टळला.
धार्मिक महोत्सव महाकुंभ भरकटत असल्याची प्रतिक्रिया बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दिली आहे. मध्यप्रदेशात छतरपूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. महाकुंभ हा ‘रील’चा नव्हे, ‘रिअल’चा विषय असल्याचे ते म्हणाले. यंदा महाकुंभमध्ये मोनालिसा, मॉडेल हर्षा रिछारिया किंवा आयआयटी बाबा अभयसिंह चर्चेत आहेत. धार्मिक बाबींपेक्षा याच गोष्टींची चर्चा वाढली असल्याने धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
रविवारी सायंकाळी महाकुंभमध्ये लागलेल्या आगीची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे. या आगीत २००हून अधिक तंबू जळून खाक झाले होते. (वृत्तसंस्था)
पाणी गेली ७५ वर्षे नव्हते इतके पवित्र आणि स्वच्छ
भाजपचे खासदार रविकिशन यांनी सोमवारी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केले. यानंतर बोलताना त्यांनी विरोधी पक्षांनी महाकुंभच्या आकडेवारीवर भाष्य न करता प्रत्यक्ष येथे यावे, असे आवाहन केले. काँग्रेसचे नेतेही येथे पवित्र स्नानासाठी येतील. येथील पाणी गेल्या ७५ वर्षे नव्हते इतके पवित्र आणि स्वच्छ असल्याचा दावा त्यांनी केला.