स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग; फोटो पाहूनच समजेल रौद्ररुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 11:00 IST2021-01-23T10:59:19+5:302021-01-23T11:00:19+5:30

fire broke out in Bihar: दीदारगंज भागातील या स्क्रॅप गोडाऊनला ही भीषण आग शनिवारी सकाळी लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

fire broke out at a scrap godown in patna, bihar; see the photo | स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग; फोटो पाहूनच समजेल रौद्ररुप

स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग; फोटो पाहूनच समजेल रौद्ररुप

पाटना : बिहारची राजधानी पाटन्यामध्ये दीदारगंज भागात एका स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग लागली आहे. ही आग किती रौद्र आणि भयानक आहे याचा फोटो पाहूनच अंदाज येऊ शकतो. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. अद्याप जीवितहाणीबाबत कोणताही माहिती मिळालेली नाही. 


दीदारगंज भागातील या स्क्रॅप गोडाऊनला ही भीषण आग शनिवारी सकाळी लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढतच गेल्याने यश आले नाही. यानंतर लगेचच फायर ब्रिगेडला याची माहिती देण्यात आली. 



फायर ब्रिगेडचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर निय़ंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. मात्र, अद्याप आगीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. आग कशी लागली याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. परंतू स्फोटक सदृष्य वस्तूमुळे आग लागल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 
 

Web Title: fire broke out at a scrap godown in patna, bihar; see the photo