जम्मू काश्मीरमधील कटरा या ठिकाणी असलेल्या माता वैष्णो देवी मंदिराच्या परिसरात आग लागल्याची घटना घटली आगे. कालिका भवनाच्या नजीक असलेल्या काऊंटर क्रमांक २ च्या जवळ ही आग लागली. सध्या आग विझवण्याचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी ही आग लागली ते ठिकाण प्राकृतिक गुहेपासून केवळ १०० मीटर अंतरावर असल्याचं म्हटलं जात आहे. व्हीआयपी गेटनजीक शॉर्ट सर्किटमुळे ही लागल्याचं सांगण्यात येत आहे. पाहताच या आगीनं उग्र रुपही धारण केलं होतं. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे. श्राईन बोर्डानं अग्नीशनम दलाला दिलेल्या माहितीनंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचं काम सुरू केलं.
Vaishno Devi Temple Fire: वैष्णो देवी मंदिर परिसरात आग; प्राकृतिक गुहेपासून १०० मीटर अंतरावर घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 18:01 IST
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. दूरपर्यंत दिसले आगीचे लोण
Vaishno Devi Temple Fire: वैष्णो देवी मंदिर परिसरात आग; प्राकृतिक गुहेपासून १०० मीटर अंतरावर घडली घटना
ठळक मुद्देशॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. दूरपर्यंत दिसले आगीचे लोण