Vaishno Devi Temple Fire: वैष्णो देवी मंदिर परिसरात आग; प्राकृतिक गुहेपासून १०० मीटर अंतरावर घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 06:00 PM2021-06-08T18:00:37+5:302021-06-08T18:01:32+5:30

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. दूरपर्यंत दिसले आगीचे लोण

A fire broke out at Mata Vaishno Devi shrine in Katra today fire under control now | Vaishno Devi Temple Fire: वैष्णो देवी मंदिर परिसरात आग; प्राकृतिक गुहेपासून १०० मीटर अंतरावर घडली घटना

Vaishno Devi Temple Fire: वैष्णो देवी मंदिर परिसरात आग; प्राकृतिक गुहेपासून १०० मीटर अंतरावर घडली घटना

Next
ठळक मुद्देशॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. दूरपर्यंत दिसले आगीचे लोण

जम्मू काश्मीरमधील कटरा या ठिकाणी असलेल्या माता वैष्णो देवी मंदिराच्या परिसरात आग लागल्याची घटना घटली आगे. कालिका भवनाच्या नजीक असलेल्या काऊंटर क्रमांक २ च्या जवळ ही आग लागली. सध्या आग विझवण्याचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी ही आग लागली ते ठिकाण प्राकृतिक गुहेपासून केवळ १०० मीटर अंतरावर असल्याचं म्हटलं जात आहे. 

व्हीआयपी गेटनजीक शॉर्ट सर्किटमुळे ही लागल्याचं सांगण्यात येत आहे. पाहताच या आगीनं उग्र रुपही धारण केलं होतं. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे. श्राईन बोर्डानं अग्नीशनम दलाला दिलेल्या माहितीनंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचं काम सुरू केलं.



दरम्यान, अग्नीशनम दलाच्या जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असल्याची माहिती माता वैष्णो देवी श्राईन बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ही आग इतकी भीषण होती की दूरवरूनही आगीचे लोण दिसत होत होती. स्थानिक प्रशासनानं आग लागण्याचं कारण शॉर्ट सर्किट असल्याचं म्हटलं आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: A fire broke out at Mata Vaishno Devi shrine in Katra today fire under control now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.