शॉर्ट सर्किटने आग लागली; आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या १० रुग्णांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 06:53 IST2026-03-17T06:52:41+5:302026-03-17T06:53:04+5:30
यावेळी नातेवाईक आणि कर्मचारी रुग्णांना बाहेर काढण्यास मदत करत होते. मात्र हे प्रयत्न फोल ठरले.

शॉर्ट सर्किटने आग लागली; आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या १० रुग्णांचा होरपळून मृत्यू
अंबिका प्रसाद कानुन्गो -
भुवनेश्वर : ओडिशातील कटक शहरात एका सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूला सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दहा रुग्णांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला ११ कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या आपल्या प्रियजनांचे जळालेले मृतदेह पाहून नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज चिरून टाकणारा होता.
या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.
नेमके काय घडले ?
एससीबी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयाचा वीजपुरवठा सोमवारी पहाटे दोनदा खंडित झाला आणि त्यानंतर आग लागली व संपूर्ण आयसीयूमध्ये दाट धूर पसरला.
आगीमुळे सात रुग्णांचा होरपळून तर ३ रुग्णांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.
यावेळी नातेवाईक आणि कर्मचारी रुग्णांना बाहेर काढण्यास मदत करत होते. मात्र हे प्रयत्न फोल ठरले.