Video: आंध्र प्रदेश एसी एक्स्प्रेसच्या 4 डब्यांना आग; सर्व प्रवासी सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 15:11 IST2018-05-21T14:17:30+5:302018-05-21T15:11:40+5:30
आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

Video: आंध्र प्रदेश एसी एक्स्प्रेसच्या 4 डब्यांना आग; सर्व प्रवासी सुरक्षित
ग्वालियर : मध्य प्रदेशातील ग्वालियारमध्ये आंध्र प्रदेश एक्स्प्रेसच्या चार डब्यांना आग लागल्याची घटना घडली. या डब्यांमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. दुपारी एकच्या सुमारास ग्लालियारमधील बिर्लानगर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या आंध्र प्रदेश एसी एक्स्प्रेसला अचानक आग लागली. या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
Four coaches of #RajdhaniExpress caught fire near #Birlanagar station in #Gwalior today. #राजधानीpic.twitter.com/a8xOTvY6zj
— Shivaji Dubey (@Shivaji_Dube) May 21, 2018
सुरुवातीला आंध्र प्रदेश एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. त्यानंतर ही आग आणखी दोन डब्यांपर्यंत पोहोचली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला. ही एक्स्प्रेस निजामुद्दीनहून विशाखापट्टणमला जात होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाल्याची माहिती मिळते आहे.