दिल्लीतील कॉसमॉस रुग्णालयात शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात खूप धूर झाल्यानंतर काच फोडून ११ रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. ऑक्सिजन सिलिंडर वेळेवर बाहेर काढण्यात आले, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.
आग लागल्यानंतर अमित नावाच्या एका हाऊसकीपिंग स्टाफने स्वतःला रुग्णालयाच्या बाथरूममध्ये कोंडून घेतलं होतं, ज्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आनंद विहारमधील कॉसमॉस हॉस्पिटलमध्ये जॉइंट रिप्लेसमेंट आणि ट्रॉमा मॅनेजमेंटशी संबंधित मेडिकल ट्रीटमेंट होते.