भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:35 IST2026-01-14T11:34:26+5:302026-01-14T11:35:03+5:30
Fire At Ravi Shankar Prasad Residence : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीस्थित निवास्थानी भीषण आग लागली आहे. आज सकाळच्या सुमारास प्रसाद यांच्या निवासस्थानी आगीची ही घटना घडली.

भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीस्थित निवास्थानी भीषण आग लागली आहे. आज सकाळच्या सुमारास प्रसाद यांच्या निवासस्थानी आगीची ही घटना घडली. रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीमधील मदर टेरेसा क्रिसेंट मार्गावर असलेल्या या निवासस्थानी आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम हाती घेतले. सुदैवाने या आगीमध्ये फारशी हानी झालेली नाही.
या आगीच्या घटनेबाबत अधिक माहिती देताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानी आग लागल्याची माहिती आम्हाला सकाळी ८ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास कळली. ही आग घरातील एका खोलीमध्ये ठेवण्यात आलेल्या खोलीला लागली होती.
ही आग सकाली सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये लागली. ही आग शमवण्यासाठी तीन फायर टेंडर घटनास्थळी पाठवण्यात आले. तसेच सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवून ती शमवण्यात आली. या आगीच्या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेला नाही. तसेच आग का लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.