Fire Breakout: दिल्लीत मेट्रो कार पार्किंगमध्ये भीषण आग, अनेक गाड्या जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 11:42 IST2022-06-08T11:40:43+5:302022-06-08T11:42:05+5:30

Fire Breakout: अचानक आग लागल्याने पार्किंगमध्ये मोठा हल्लकल्लोळ माजला होता

Fire Breakout: A huge fire broke out in the metro car parking lot in Delhi, burning many vehicles | Fire Breakout: दिल्लीत मेट्रो कार पार्किंगमध्ये भीषण आग, अनेक गाड्या जळून खाक

Fire Breakout: दिल्लीत मेट्रो कार पार्किंगमध्ये भीषण आग, अनेक गाड्या जळून खाक

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांमध्ये आगीच्या घटनांत वाढ झाली आहे. आता, जामीया नगरमधील इलेक्ट्रीक वाहन पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. आज सकाळी अचानक येथील एका गाडीला आग लागली. त्यानंतर इतर गाड्यांनीही पेट घेतला. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमनचे 11 बंब घटनास्थळी दाखल झाले असून त्यांन आग आटोक्यात आणली आहे. 

अचानक आग लागल्याने पार्किंगमध्ये मोठा हल्लकल्लोळ माजला होता. या दुर्घटनेत अनेक वाहनं जळून खाक झाली आहेत. ई-कार आणि काही ई-रिक्षाही जळाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. मात्र, प्रशासनाने तात्काळ दखल घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 


येथील मेट्रो पार्किंगमध्ये 10 कार, 1 मोटारसायकल, 2 स्कुटी, 30 ई-रिक्षा, 50 जुन्या ई-रिक्षांना या आगीचा फटका सहन करावा लागल्याची माहिती दिल्ली फायर सर्व्हीसने दिली आहे.
 
 

Web Title: Fire Breakout: A huge fire broke out in the metro car parking lot in Delhi, burning many vehicles