एक हजार फुकट्या प्रवाशांकडून पाच लाखांचा दंड वसूल

By Admin | Updated: May 31, 2016 06:04 IST2016-05-31T06:04:49+5:302016-05-31T06:04:49+5:30

रेल हमसफर सप्ताहात भुसावळ विभागातील स्थानकांवर रविवारी एक हजार २० फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

A fine of five lakh rupees was collected from thousands of passengers | एक हजार फुकट्या प्रवाशांकडून पाच लाखांचा दंड वसूल

एक हजार फुकट्या प्रवाशांकडून पाच लाखांचा दंड वसूल

भुसावळ (जि. जळगाव) : रेल हमसफर सप्ताहात भुसावळ विभागातील स्थानकांवर रविवारी एक हजार २० फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यात प्रवाशांकडून चार लाख ९९ हजार ४२५ रुपये दंड वसूल करण्यात आला, वाणिज्य विभागाने ही कारवाई केली.
फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रविवारी वाणिज्य विभागाने भुसावळ जंक्शनसह विविध स्थानकांवर तपासणीसाठी विशेष पथके नेमली होती. त्यात १७५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. भुसावळसह, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, खंडवा, बऱ्हाणपूर या स्थानकांवर प्रत्येकी तीन ते चार पथके होती.

Web Title: A fine of five lakh rupees was collected from thousands of passengers