शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

FinCEN Files : घोटाळे, अफरातफर, करचोरीमधून लाखो कोटींचा भ्रष्टाचार; नावे जाहीर झाल्यास देशात होईल राजकीय भूकंप

By बाळकृष्ण परब | Published: September 21, 2020 9:28 AM

अमेरिकेच्या अर्थखात्याच्या फायनान्शियल क्राइम्स इंफोर्समेंट नेटवर्क (FinCEN Files) कडे भारतातील घोटाळेबाज, भ्रष्ट नोकरशाहा आणि बँकांमध्ये अफरातफर करणाऱ्यांची एक अशी यादी आहे जी जाहीर झाल्यास भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देफिनसेनच्या कागदपत्रांमधून भारतातील सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा उलगडा करचोरीच्या अनेक प्रकरणांमध्ये गुंतलेल्या कंपन्या आणि व्यक्तींच्या नावांचा समावेशही नावे जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथा पालथ होण्याची शक्यता

नवी दिल्ली - घोटाळे, अफरातफर आणि करचोरीच्या माध्यमातून देशात झालेल्या तब्बल दोन लाख कोटींच्या भ्रष्टाचाराचा धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. अमेरिकेच्या अर्थखात्याच्या फायनान्शियल क्राइम्स इंफोर्समेंट नेटवर्क (FinCEN Files) कडे भारतातील घोटाळेबाज, भ्रष्ट नोकरशाहा आणि बँकांमध्ये अफरातफर करणाऱ्यांची एक अशी यादी आहे जी जाहीर झाल्यास भारताच्याराजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.फिनसेनच्या कागदपत्रांमध्ये ऑगस्टा वेस्टलँड, एअरसेल मॅक्सिस, २जी घोटाळा आणि रोल्स रॉयस लाचखोरी प्रकरणासह करचोरीच्या अनेक प्रकरणांमध्ये गुंतलेल्या कंपन्या आणि व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट (आयसीआयजे) यांच्या मदतीने या नावांचा उलगडासुद्धा होऊ लागला आहे. फिनसेन फाइल्सने ज्या नावांची यादी तयार केली आहे, त्याची माहिती आता ८८ देशांमधील १०९ हून अधिक वृत्तसंस्थांना झाली आहे. त्यामुळे ही नावे जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथा पालथ होण्याची शक्यता आहे.इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार फिनसेनकडून मिळालेल्या दोन हजार गोपनीय कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पैशांची मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या देवाणघेवाण करणाऱ्या अनेक भारतीयांच्या नावांचा उलगडा झाला आहे. दरम्यान, या अफरातफरीमध्ये ज्यांच्या मदतीने हे घोटाळे झाले, त्या बँकांच्या नावांचाही समावेश आहे.फिनसेनच्या कागदपत्रांमधून भारतातील सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा उलगडा झाला आहे. दरम्यान, भारतातील विविध तपास यंत्रणा चौकशी करत असलेल्या विविध घोटाळेबाज व्यक्तींच्या नावांचा या कागदपत्रांमधून शोघ घेण्याचा प्रयत्न केल्याचे या वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकेच्या फिनसेनच्या कागदपत्रांमध्ये ऑगस्टा वेस्टलँड, एअरसेल मॅक्सिस, २जी घोटाळा आणि रोल्स रॉयस लाचखोरी अशा मोठ्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. तसेच या यादीत अशा कंपन्या आणि व्यक्तींचा समावेश आहे ज्यांची चौकशी भारतातील सीबीआय, ईडी आणि डीआरआय अशा यंत्रणा करत आहेत.फिनसेन फाइल्समध्ये ग्लोबल डायमंड कंपनीचा भारतात जन्मलेला एक सदस्य, हेल्थकेअर आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमधील एका मोठ्या कंपनी, आयपीएल टीमची एक स्पॉन्सर कंपनी. सध्या तुरुंगात असलेला दुर्मीळ वस्तूंचा तस्कर, आलिशान कारचा एक डिलर आणि भारतातील अंडरवर्ल्ड डॉनचा एक फायनान्सर यांच्यासह अन्य कंपन्या आणि व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे.फिनसेन फाइल्सच्या हाती लागलेल्या कागदपत्रांमध्ये १९९९ ते २०१७ या काळात भारतात घडलेल्या घटनांचा समावेश आहे.वृत्तात म्हटल्याप्रमाणे भारतातील बँकांच्या ३ हजार २०१ खात्यांमधून १.५३ अब्ज डॉलर सुमारे ११२ कोटी रुपयांची देवाणघेणाव झाली. यापैकी अनेकांचे पत्ते भारतातील आहेत. तर काही परदेशी पत्त्यांचाही उल्लेख आहे. भारतातील ४४ बँकांचा वापर अवैधरीत्या देवाणघेवाण करण्यासाठी झाला आहे. त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, इंडसइंड बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचा समावेश आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारIndiaभारतPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारी