शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

CoronaVirus News : केंद्रीय अर्थमंत्री आज मोठ्या घोषणा करण्याची शक्यता, शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 9:30 AM

बुधवारी अर्थमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बळकटी देण्यासाठी सुमारे 6 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.

ठळक मुद्देभारतीय अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज पत्रकार परिषद घेऊन इतर घोषणा करणार आहेत. अर्थमंत्री आज कृषी क्षेत्र आणि त्यासंबंधित कामांची घोषणा करू शकतात.

नवी दिल्ली. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज पत्रकार परिषद घेऊन इतर घोषणा करणार आहेत. अर्थमंत्री आज कृषी क्षेत्र आणि त्यासंबंधित कामांची घोषणा करू शकतात. बुधवारी अर्थमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बळकटी देण्यासाठी सुमारे 6 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार आणि विकासकांना नुकसानभरपाईशिवाय सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यासारख्या काल घोषणा करण्यात आल्या होत्या. टीडीएस आणि टीसीएसमध्ये त्रैमासिक कपात, आयकर विवरणपत्र सादर करणे आणि एमएसएमईची व्याख्या बदलण्यासारखे मोठे निर्णय घेतले होते. आता दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांसाठी काय असू शकते विशेष पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या मुदतवाढीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासंबंधीही घोषणा होऊ शकते. मागील 6 वर्षात झालेल्या सुधारणांमुळे आज भारताची अर्थव्यवस्था अधिक कार्यक्षम व सामर्थ्यवान झाली आहे. सुधारणांची व्याप्ती नवीन उंची गाठत आहे. या सुधारणा शेतीशीदेखील जोडल्या जाऊ शकतात. जेणेकरून शेतकऱ्या सक्षम बनवता येईल. भविष्यात कोरोना संकटासारख्या इतर कोणत्याही आपत्तीत शेतीच्या कामकाजावर कशा पद्धतीनं कमी परिणाम होईल, याचं नियोजनही केलं जाण्याची शक्यता आहे. काळाची गरज ओळखून मोदी सरकारनं हे मोठं पॅकेज दिलं असून, आता शेतकऱ्यांसाठीही या आर्थिक पॅकेजमध्ये अनेक तरतुदी असू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी तिच्या पहिल्या टप्प्यात तपशील दिला. यामध्ये छोट्या उद्योगात काम करणा-यांना दिलासा मिळाला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

52 दिवसांपासून ड्युटीवरच नर्स; अचानक मुलीचा व्हिडीओ कॉल आला अन् अश्रूंचा बांध फुटला

CoronaVirus News : पायी बिहारला जाणाऱ्या मजुरांना भरधाव रोडवेज बसने चिरडले, 6 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधान

विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन